नवी दिल्ली : ओडिशातील बालासोर ट्रेन दुर्घटनेत मोठ्या संख्येने लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातानंतर उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी पुढे आले आहेत. अंबानी समूहाच्या रिलायन्स फाऊंडेशनने पीडितांच्या मदतीसाठी मदतीची घोषणा केली आहे. या कठीण काळात पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे नीता अंबानी यांनी म्हटले आहे. रिलायन्स फाऊंडेशनने १० कलमी मदत पॅकेज जाहीर केले आहे. या सवलतींमध्ये ६ महिन्यांसाठी मोफत रेशन, औषधे आणि मृत व्यक्तीच्या आश्रितांना नोकरी देण्याचा समावेश आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे.

सर्व प्रकारच्या मदतीची घोषणा

शोक व्यक्त करताना, रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापिका आणि अध्यक्षा, नीता अंबानी म्हणाल्या, ‘रेल्वे दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांच्या पाठीशी मी उभी असून मी जड अंत:करणाने सहवेदना व्यक्त करते. या दुर्घटनेमुळे होणारे दु:ख मी दूर करू शकत नाही, परंतु शोकग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी आपण पूर्णपणे कटिबद्ध आहोत. या कठीण काळात आम्ही पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.’

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबाबत आली मोठी अपडेट, आयसीयूतून बाहेर हलविले
जीवनावश्यक वस्तू उरलब्ध करणार

दुर्घटना घडल्यानंतर बालासोरमध्ये उपस्थित रिलायन्स फाऊंडेशन टीम बालासोर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन पथक आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या समन्वयाने काम करत आहे. रिलायन्स फाऊंडेशन जखमींना रुग्णवाहिकेत हलविण्यात मदत करत आहे, मास्क, हातमोजे, ओआरएस, बेडशीट, दिवे आणि गॅस कटर इत्यादीसारख्या इतर आवश्यक बचाव वस्तू तात्काळ पुरवत आहे.

नागपूर पोलिसांची फिल्मी स्टाइल कारवाई; हाती लागले मोठे घबाड, सुरतपर्यंत केला चोरट्यांचा पाठलाग
मदतीचे पॅकेज केले जाहीर

> जिओ-बीपी नेटवर्कवरून रुग्णवाहिकांसाठी मोफत इंधन
> रिलायन्स स्टोअर्सद्वारे बाधित कुटुंबांना पुढील सहा महिन्यांसाठी पीठ, साखर, डाळी, तांदूळ, मीठ आणि स्वयंपाकाच्या तेलासह मोफत रेशन पुरवठ्याची तरतूद
> जखमींना त्वरित बरे होण्यासाठी मोफत औषधे
> अपघातामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या लोकांवर वैद्यकीय उपचार
> भावनिक आणि मानसोपचारविषयक समुपदेशन सेवा.
> गरज भासल्यास जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे
> अपंग लोकांसाठी व्हीलचेअर, कृत्रिम अवयवांसह सहाय्यांची तरतूद
> नवीन रोजगार संधी शोधण्यासाठी बाधित लोकांना विशेष कौशल्य प्रशिक्षण
> ज्या महिलांनी आपल्या कुटुंबाचा एकमेव कमावणारा माणूस गमावला आहे त्यांच्यासाठी मायक्रोफायनान्स आणि प्रशिक्षणाच्या संधी
> दुर्घटनेत बाधित झालेल्या ग्रामीण कुटुंबांना पर्यायी उपजीविकेसाठी गाय, म्हैस, शेळी, पक्षी यांसारखे पशुधन उपलब्ध करून देणे.
> शोकग्रस्त कुटुंबातील सदस्यांना त्यांची उपजीविका पुन्हा उभारता यावी यासाठी त्यांना एक वर्षासाठी मोफत मोबाईल कनेक्टिव्हिटी.

दुर्दैवी! शाळेचा स्विमिंग पूल बनला मृत्यूचा तलाव, १२ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू, सुट्टीत आला होता मामाच्या घरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here