मुंबई: सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर ठाकरे सरकार अडचणीत आले आहे. विरोधकांबरोबरच बॉलिवूडमधील काही मंडळींनी सरकारच्या भूमिकेवर टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे कुटुंबाला नेहमीच लक्ष्य करणारे माजी खासदार यांनी या संदर्भात खूपच तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा:

सुशांतसिंह प्रकरणात ठाकरे सरकारमधील एका युवा मंत्र्यांचा सहभाग असल्याचा आरोप भाजपनं केला होता. तसंच, या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्यावी अशी मागणीही लावून धरली होती. संबंधित युवा मंत्र्यांवर आरोप करण्यात नीलेश राणे आघाडीवर होते. सुशांत प्रकरणात ते सातत्यानं ट्वीट करत होते. त्यांच्या आरोपांचा रोख थेट मुंबईतील युवा मंत्र्यावर असायचा. आता सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे गेल्यानंतर नीलेश राणे अधिकच आक्रमक झाले आहेत. त्यांनी एका मागोमाग एक दोन ट्वीट केले आहेत.

वाचा:

‘लवकरच AUT सरकारमधून OUT होतील आणि जेलमध्ये जातील. ह्या लोकांनी आतापर्यंत भरपूर मजा मारलीय. एवढंच नाही तर त्यांना पुरावे नष्ट करण्यास जवळपास ६० दिवस मिळालेत. आपण सर्वांनी यापुढंही दक्ष राहिलं पाहिजे,’ असं त्यांनी म्हटलंय. ‘ व दिशा सालियनच्या खऱ्या गुन्हेगारांना नक्कीच शोधून काढेल,’ अशी आशाही नीलेश राणे यांनी व्यक्त केली आहे. नीलेश राणे यांच्या ट्वीटमधील AUT कोण?, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

दुसऱ्या एका ट्वीटमध्ये नीलेश राणे म्हणतात, ‘नियती कोणाला सोडत नाही. ह्याच जन्मात हिशेब द्यावे लागणार. मनाला वाट्टेल तसे हे वागले, पण आता लोकांकडून फटके खायची वेळ आली.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here