मुंबई : IT क्षेत्रातील दिग्गज विप्रोच्या भागधारकांनी १२,००० कोटी रुपयांच्या शेअर बायबॅक योजनेला मंजुरी दिली असून विप्रोने यासाठी रेकॉर्ड डेटही निश्चित केली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या परीक्षकांच्या अहवालात शेअर बाजारांना ही माहिती देण्यात आली आहे. विप्रोने आपल्या १२ हजार कोटी रुपयांच्या शेअर बायबॅक योजनेसाठी १६ जून ही रेकाॅर्ड तारीख ठरवली आहे. कंपनीने २७ एप्रिल रोजी बायबॅक योजना जाहीर केली असून तेव्हापासून विप्रोचा शेअर्स ८% हून अधिक वाढला आहे. विप्रो ही भारतातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक आहे.

TATA चा शेअर एकदम सुसाट, थांबता थांबेना! गुंतवणूकदारांची तुफान कमाई, वाचा सविस्तर
इतकी फ्लोर प्राइस
विप्रोने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले की, कंपनीने १६ जून ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. रेकॉर्ड डेट म्हणजे त्या तारखेपर्यंत विप्रोचे शेअर्स ठेवणारे गुंतवणूकदार या बायबॅकमध्ये सहभागी होऊ शकतात. बायबॅकमध्ये कंपनी २६ कोटींहून अधिक शेअर्स खरेदी करेल. हे एकूण शेअर्सच्या ४.९१% असून यासाठी कंपनीने फ्लोअर प्राइस ४४५ रुपये निश्चित केली आहे. कंपनीच्या सध्याच्या बाजारभावापेक्षा ही किंमत सुमारे ९.८% जास्त आहे. या अहवालानुसार, ९९.९% भागधारकांनी पोस्टल बॅलेट आणि ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारे प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले असून ई-मतदान ३ मे रोजी सकाळी सुरू झाले आणि १ जून रोजी संपले.

गुंतवणूक करताय… हे लक्षात घ्या!

मार्च तिमाहीचे निकाल कमजोर
मार्च २०२३ च्या तिमाहीत विप्रोचा एकत्रित नफा ०.४ टक्क्यांनी घसरला. तिमाहीत कंपनीला ३,०७५ कोटी रुपये नफा मिळाला. मागील वर्षी याच कालावधीत कंपनीला ३,०८७ कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीला एकत्रित महसूल ११.२ टक्क्यांनी वाढून २३,१९० कोटी रुपये झाला आहे. जून तिमाहीत कंपनीने स्थिर चलनाच्या महसुलात ३ ते १% घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कंपनीचे मार्च तिमाहीचे निकाल निराशाजनक आहेत. पण, बायबॅक झाल्यापासून कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे.

Tata Group Stocks: गुंतवणूकदारांना लॉटरी! हातात येणार कोऱ्या करकरीत नोटा, तुमच्याकडे आहे का हे स्टॉक्स…
शेअर्सवर विश्लेषकांचा सल्ला
विश्लेषकांचा शेअर्सबद्दल संमिश्र दृष्टिकोन आहे. ब्लूमबर्गच्या मते, १७ विश्लेषकांनी विप्रो शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. १२ विश्लेषकांनी शेअर्स ठेवण्याचा सल्ला दिला आहे. तर १२ विश्लेषकांनी त्यावर विक्री रेटिंग दिले आहे. शेअर्सचे १२ महिन्यांचे लक्ष्य ३९० रुपये आहे. सध्याच्या किंमतीपेक्षा ही घसरण सुमारे ३.७% आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here