म.टा. प्रतिनिधी, नागपूर : नागभीड-नागपूर महामार्गावरील काम्पा गावाजवळ रविवारी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह सोमवारी सायंकाळी चंदननगर येथे आणण्यात आले. कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह बघताच कुटुंबप्रमुख विजय राऊत यांचा संयमाचा बांध फुटला. ते धाय मोकलून रडायला लागले. ‘कुणा-कुणाला खांदा देऊ…, काय चूक झाली आमची’, असा टाहो करीत ते धाय मोकलून रडायला लागले. एका कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याने चंदननगरमधील नागरिकही स्तब्ध झाले, शोककळा पसरली.

रविवारी दुपारी राऊत, फेंडर कुटुंब व अन्य नातेवाईक कारने (एमएच-४९-बीआर-२२४२) ब्रह्मपुरीकडे जायला निघाले. काम्पा परिसरात एआरबी ट्रॅव्हल्सच्या बसने (एमएच-३३-टी-२६७७) कारला धडक दिली. यात रोहन विजय राऊत (वय ३०), ऋषिकेश विजय राऊत (वय २८), गीता विजय राऊत (वय ४५), गीता यांची बहीण प्रभा शेखर सोनवणे तसेच सुनीता रूपेश फेंडर (४०) व त्यांची मुलगी यामिनी (वय ९) यांचा मृत्यू झाला. या अपघाताची वार्ता चंदननगर येथे येताच परिसरात शोककळा पसरली. विजय व त्यांच्या आईने हंबरडा फोडला.

shivrajyabhishek sohala 2023 : रायगडावर अडीच लाख शिवभक्त; संभाजीराजेंकडून महत्त्वाच्या सूचना

१७५० कोटींचा चुराडा, बिहारमध्ये १०० फूट लांबीचा पुल पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला

पाच जणांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

सोमवारी दुपारी पाच जणांचे मृतदेह नागपुरात आणण्यात आले. एकाच वेळी पाच जणांचे पार्थिव मोक्षधाम घाटाकडे नेण्यात आले. रोहन, ऋषिकेश, गीता, सुनीता रूपेश फेंडर (४०) व यामिनी यांच्या पार्थिवावर एकाच वेळी मोक्षधाम घाट येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तर प्रभा शेखर सोनवणे यांच्या पार्थिवावर लाखनी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

समजूत घालायला गेले, ते कायमचेच

रोहनचे चार वर्षांपूर्वी मीनाक्षी यांच्यासोबत लग्न झाले. एक वर्षापासून मिनाक्षी या माहेरी आहेत. त्यांची समजूत घालून त्यांना घरी परत आणण्यासाठी राऊत व फेंडर कुटुंब रविवारी कारने ब्रह्मपुरीकडे निघाले. काळ त्यांच्या मागावर होता. काम्पा परिसरात काळाने घात केला. समजूत घालायला गेलेले सहा जण गेले ते कायमचेच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here