वृत्तसंस्था, बालासोर: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील भीषण रेल्वे अपघातानंतर सोमवारी या मार्गावरील वाहतूक सुरू झाली. सकाळी हावडा-पुरी वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेही धावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही सेमी हायस्पीड रेल्वे मार्गस्थ होताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते.

वंदे भारत एक्स्प्रेसने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता बहानगा बाजार स्थानक ओलांडले. याच स्थानकाजवळ शुक्रवारी भीषण रेल्वे अपघात झाला होता. वंदे भारत एक्स्प्रेस अपघाताच्या ठिकाणी आली तेव्हा तिचा वेग मंदावला. त्यामुळे प्रवाशांना अपघातस्थळावरचे दृश्य पाहता आले. याठिकाणी अपघातग्रस्त एक्स्प्रेस गाडीचे काही उलटलेले डबे होते. हे सगळे दृश्य पाहताना ‘वंदे भारत’मधील प्रवाशी नि:शब्द झाले होते. काहीजण ‘जगन्नाथ जगन्नाथ’ असे पुटपटत होते. प्रत्येकजण खिडक्यांबाहेर पाहत होता. बहुतांश प्रवासी अपघातस्थळाचे दृश्य पाहून अवाक झाले होते.

Odisha Accident: कोरोमंडल १२८ च्या वेगाने धडकली अन् डबे पत्त्यासारखे विखुरले; रेल्वेने सांगितलं अपघाताचं कारण

अपघातस्थळी रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून, अप आणि डाऊन मार्ग रेल्वे संचालनासाठी खुले झाले आहेत. हावडा-पुरी एक्स्प्रेस आणि भुवनेश्वर-नवी दिल्ली संपर्क क्रांती एक्स्प्रेस या दोन रेल्वेदेखील सोमवारी सकाळी अनुक्रमे अप आणि डाउन मार्गिकेवरून मार्गस्थ झाल्या. रेल्वे मार्गांच्या दुरुस्तीचे काम रविवारी रात्री पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिली. विझाग बंदरातून राऊरकेला पोलाद प्रकल्पाकडे कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाड्याही रविवारी रात्री १०.४० वाजता या मार्गावरून रवाना झाल्या.

पप्पा, मला विंडो सीट पाहिजे! लेक हट्टाला पेटली अन् जीव वाचला; बापलेकीसोबत चमत्कार घडला

अशा धावल्या गाड्या…

* रविवार रात्री १०.४० : रूरकेला स्टील प्रकल्पाकडे मालगाडी रवाना

* सोमवार सकाळ ९.३० : हावडा-पुरी वंदे भारत एक्स्प्रेस

* सोमवार पहाटे : हावडा-पुरी एक्स्प्रेस व भुवनेश्वर-नवी दिल्ली एक्स्प्रेस

रेल्वेकडून चौकशी सुरू

बालासोर : रेल्वे सुरक्षा आयुक्त (एसई सर्कल) शैलेशकुमार पाठक यांनी या अपघातप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. त्यांनी बहानगा बाजार स्थानकाजवळील अपघातस्थळी भेट दिली. नियंत्रण कक्ष, सिग्नल रूमचीही त्यांनी पाहणी केली; तसेच स्टेशन मॅनेजरशी चर्चा केली. कोरोमंडल एक्स्प्रेस लूप लाइनमध्ये घुसण्यास कारणीभूत असलेल्या इंटरलॉकिंग यंत्रणेचीही पाहणी त्यांनी केली.

मृतांचा आकडा २७५

भुवनेश्वर : रेल्वे अपघातात २८८ मृत्यू झाल्याचे सुरुवातीला समोर आले होते. मात्र, काही मृतदेह दोनदा मोजल्याचे सांगून मृतांची संख्या २८८ नव्हे, तर २७५ असल्याचे ओडिशा सरकारने स्पष्ट केले होते. सरकारने मृतांच्या आकडेवारीत हस्तक्षेप केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावर ओडिशाचे मुख्य सचिव पी. के. जेना म्हणाले, ‘रेल्वेने मृतांची संख्या २८८ सांगितली होती. आम्हीदेखील रेल्वेच्या माहितीवरूनच संख्या सांगितली. मात्र, बालासोरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मृतांच्या संख्येची पडताळणी केली आणि रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ही संख्या २७५ आहे. त्यापैकी १०८ मृतदेहांची ओळख पटली आहे.’

इंजिनचालकांचे जबाब नोंदवले

भुवनेश्वर : शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसच्या दोन्ही चालकांचे सोमवारी रेल्वे सुरक्षा आयुक्त कार्यालयाकडून जबाब नोंदवण्यात आले. चालक गुणनिधी मोहंती व सहाय्यक चालक हजारी बेहेरा यांच्यावर भुवनेश्वरच्या ‘एम्स’ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेहेरा यांच्या डोक्याची शस्त्रक्रिया होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here