मुंबई : कामावर येण्यास उशीर किंवा पूर्ण न झालेल्या टार्गेटमुळे बॉसने नाराज होणे किंवा रागावणे, हे काही नवीन नाही. परंतु ज्युनिअर सहकार्‍यासोबत असभ्य वर्तन होत असल्याचे दिसत आहे आणि असेच भारतातील आघाडीची कर्ज देणारी वित्तीय संस्था एचडीएफसीच्या काही कर्मचार्‍यासोबत झाले आहे. उपाध्यक्ष पदाच्या एका अधिकाऱ्याने ज्युनिअर कर्मचाऱ्याशी व्यावसायिक कारणामुळे गैरवर्तन केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बँकेने आता कारवाई केली.

उच्च पदस्थ अधिकाऱ्याची ज्युनिअरशी गैरवर्तन
एचडीएफसी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बैठकीत या अधिकाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत गैरवर्तन केले होते. ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एचडीएफसी बँकेचा अधिकारी त्याच्या ज्युनिअर सहकाऱ्यावर ओरडत असल्याचे दिसून येते. बँकिंग आणि विमा उत्पादने विकू शकत नसल्यामुळे अधिकारी संतापला आणि आपल्या ज्युनिअर कर्मचाऱ्यांवर भडकला.

HDFC बँक-HDFC कंपनीचं विलीनीकरण, बदलणार अनेक नियम; FD ग्राहकांवर काय परिणाम होणार?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक त्याच्या ज्युनिअर कर्मचाऱ्याला दररोज ७५ विमा पॉलिसी विकण्यास सांगत आहेत. ग्रामीण भागातील ७५ वर्ष जुन्या बँक ग्राहकांना चुकीची माहिती देऊन जीवन विमा पॉलिसी विकण्यात आल्याची अनेक प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत.

HDFC बँकेचा उच्च पदस्थ अधिकारी निलंबित
खासगी क्षेत्रातील सर्वत मोठी विट्टी संस्था एचडीएफसी बँकेने सोमवारी ज्युनिअर कर्मचार्‍यांशी गैरवर्तन केल्याबद्दल त्यांच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. या अधिकाऱ्याने व्यावसायिक कारणास्तव आपल्या ज्युनिअर कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला.

कमाईचा नवीन मार्ग! HDFCने लॉन्च केला देशातील पहिला डिफेन्स फंड, २ जूनपर्यंत करू शकता गुंतवणूक
सहसा बँका त्यांच्या सहयोगी कंपन्यांची विमा उत्पादने त्यांच्या ग्राहकांना विकतात. सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांना आजकाल थर्ड पार्टी उत्पादनांच्या विक्रीबाबत उच्च व्यवस्थापनाकडून खूप दबावाचा सामना करावा लागत असून असे टार्गेट चुकले तर त्यांच्यावर कारवाई झाली असती. तसेच जर एखादा कर्मचारी अशी उत्पादने विकण्यात यशस्वी झाला, तर त्याला अनेक फायदे दिले जातात.

HDFC बँकेची अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई
एचडीएफसी बँक अधिकाऱ्याच्या गैरवर्तनाबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेत एचडीएफसी बँकेने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली असून संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. या संदर्भात सखोल चौकशी करण्यात येत असून बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अधिकाऱ्याच्या वर्तनाचा आढावा घेऊन बँक निर्णय घेईल. बँकिंग व्यवसायातील दिग्गज कंपनीने म्हटले की कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या कृत्यांसाठी शून्य सहनशीलता धोरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here