सोने-चांदीचा आजचा भाव काय?
मौल्यवान सोन्या आणि चांदीच्या किमतीत आज उलथापालथ झालेली दिसत आहे. MCX वर सोन्याचा भाव १४ रुपयांच्या किंचित वाढीसह ५९,८६२ रुपये प्रति १० ग्रॅमच्या वर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे चांदीची किंमत प्रति तोळा ५०० रुपयांनी महागली आहे. अशाप्रकारे एमसीएक्सवर चांदीचा दर ७१,९९० रुपये प्रति किलोच्या पुढे गेला आहे. जागतिक पातळीवर घडामोडींमुळे सोने-चांदीच्या किमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत.
भारतात सोन्याचा भाव
भारतात २४ कॅरेट सोन्याच्या किमती आजही अनेक शहरांमध्ये ६०,००० रुपये प्रति ग्रॅमवर आहेत, परंतु आज पुन्हा घसरणीचा कल कायम राहील. भारतातील सोन्याच्या किमती सामान्यत: जागतिक पातळीवरील आर्थिक परिस्थिती, चलनवाढीचा दर, चलनातील चढउतार आणि स्थानिक मागणी व पुरवठा गतीशीलतेसह विविध घटकांनुसार ठरवली जाते. दरम्यान, अलीकडील सरकारी आकडेवारीनुसार जागतिक आर्थिक अनिश्चिततेमुळे चालू खात्यातील तुटीवर परिणाम करणारी भारताची सोन्याची आयात २०२२-२३ मध्ये २४.१५% घसरून ३५ अब्ज डॉलर राहिली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदी
जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. कालच्या कमजोरीनंतर आज कोमॅक्सवर सोने आणि चांदी हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. कोमॅक्सवर सोने प्रति औंस $१९७५ तर चांदीची किंमत देखील प्रति औंस $२३.७० वर व्यवहार करत आहे. डॉलरच्या कमजोरीमुळे सोन्यातील दरवाढ कायम असून यूएस बाँडच्या उत्पन्नावरील सौम्य दबाव देखील किमतींना आधार देत आहे.
पुढील काही महिन्यांत बाजाराला $१ ट्रिलियनचे रोखे जारी होण्याची अपेक्षा आहे, परंतु फेडरल रिझर्व्हची कठोर भूमिका अजूनही किमतींवर दबाव आणत आहे. उच्च चलनवाढ आणि चांगल्या यूएस जॉब डेटामुळे फेड जूनमध्ये दर आणखी वाढवेल, असे अपेक्षित आहे. काल आलेले अमेरिकेचे सर्व्हिस पीएमआयचे आकडेही संकेत देत आहेत. कारण एप्रिलमधील ५१.९ च्या तुलनेत मे महिन्यात सेवा पीएमआय ५०.३ वर आला आहे.