मुंबई : टाटा समूहाला यशाच्या नव्या शिखरावर नेऊन ठेवणारे टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष रतन टाटा फक्त यशस्वी उद्योगपती नाही, तर भारतातील सर्वात मोठे दानवीर म्हणून ओळखले जातात आणि टाटा समूह रतन टाटा यांच्या हृदयाच्या खूप जवळ आहे हे सर्वज्ञात आहे. म्हणून जेव्हा त्यांनी टाटा सन्सच्या उच्च पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी संपूर्ण पदभार त्यांचे राईट हॅन्ड नटराजन चंद्रशेखरन यांना दिला आणि त्यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.

एन. चंद्रशेखरन यांना रतन टाटांच्या सर्वात जवळचे व्यक्ती म्हणून ओळखले जाते. ते टाटा सन्सचे तसेच एअर इंडियाचे अध्यक्ष आहेत, जे आता टाटा समूहाचा एक भाग आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चंद्रशेखरन यांचा प्रवास फार प्रेरणादायी आहे. अलीकडेच त्यांच्या प्रवासाची कहाणी ‘Working: What We Do All Day’ या नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरीमध्ये दाखवण्यात आली आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये चंद्रशेखरन यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यासोबतच त्यांच्या बालपणीच्या खास आठवणीही सांगितल्या.

टाटांनी उंचावली भारताची मान; जगातील सर्वात नाविन्यपूर्ण कंपन्यांच्या यादीत मानाचे स्थान
शेतकऱ्यांच्या मुलाची उंच भरारी

N Chandrasekaran Success Story


त्यांनी म्हटले की त्यांच्या आईने त्यांच्यामध्ये कठोर परिश्रम करण्याची भावना निर्माण केली, जी त्यांच्या तीन दशकांच्या कारकिर्दीत उपयोगी पडली. १९६३ मध्ये तामिळनाडूच्या मोहनूर गावात जन्मलेल्या चंद्रशेखरनचे आई-वडील शेती करायचे. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातील सरकारी शाळेत झाले असून सुरुवातीपासूनच संगणकशास्त्राकडे त्यांचा कल होता. अभ्यासात त्यांनी नेहमीच प्रभावित केले आणि त्यामुळे त्यांना कोईम्बतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश मिळाला. अप्लाइड सायन्सेसमध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर, त्यांनी तिरुचिरापल्ली येथील प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन पदवी मिळवली.

अंबानी कुटुंबाशी स्पर्धा, टाटांशीही वाद; मोठ्या उद्योगपतींविरुद्द युद्ध छेडणारे नुस्ली वाडिया आहेत तरी कोण?
शेतकऱ्याचा मुलगा आज टाटाचा बॉस

Natarajan Chandrasekaran Journey in Tata Group


वेळ मिळताच चंद्रशेखरन आपल्या आई-वडिलांना शेतीत मदत करायचे. आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरूवात त्यांना टाटामधूनच केली. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९८७ मध्ये ते TCS मध्ये इंटर्न रुजू झाले. अशाप्रकारे जिथे त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली, आज तिथेच ते बॉस बनले आहेत.

एक मराठी तरुण ढाब्यावर ट्रक ड्रायव्हरसोबत बसायचा, त्याच्याच नावाने पुढे टाटा सुमो तयार झाली

२००७ मध्ये त्यांचा TCS बोर्डात समावेश करण्यात आला, ज्यानंतर त्यांना चीफ ऑपरेटिंग ऑफिसरची (सीओओ) जबाबदारी मिळाली. त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणजे ऑक्टोबर २००९ मध्ये ते TCS च्या सीईओ पदी विराजमान झाले. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या ४६व्या वर्षी कंपनीचे सर्वात तरुण सीईओ होते.

सर्वाधिक पगार असलेले सीईओ

टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांचा पगार


२०१९ मध्ये एन चंद्रशेखरन यांचा पगार ६५ कोटी रुपये होता. २०२१-२२ मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना १०९ कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले आणि ते भारतातील सर्वाधिक पगार घेणारे सीईओ बनले. तसेच त्यांच्या मालमत्तेबद्दल बोलायचे तर २०२० मध्ये त्यांनी मुंबईत ९८ कोटी रुपये किंमतीचा डुप्लेक्स फ्लॅट खरेदी केला. ६००० स्क्वेअर फूट पसरलेल्या या फ्लॅटचे दरमहा भाडे २० लाख रुपये असून हा फ्लॅट मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे निवासस्थान असलेल्या अँटिलियाच्या जवळ आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here