यंदा देशांतर्गत तुरीचे उत्पादन घटल्याने तूर भाव खावून जात आहे. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारात होणारे भावाचे चढउतार पाहता पूर्ण देशभरात होणारे पीक यावर आता बाजारपेठेतील भाव ठरतात. जिल्ह्यात सोयाबीननंतर तुरीची मोठ्या प्रमाणात पेरणी केलीजाते. गतवर्षी ४० हजार हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आली होती. अतिवृष्टी व सततच्या पावसाचा तुरीला फटका बसला. त्यात ऐन फुलधारणेच्यावेळी धुक्यामुळे तुरीच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. मात्र, यंदा सुरुवातीपासूनच तुरीला बाजारात बन्यापैकी दर मिळत आहे. सद्यस्थितीत तुरीने उच्चांक गाठल्याचे दिसून येते. मानोरा बाजार समितीमध्ये विक्रमी ११ हजार १११ चा दर मिळाला. याठिकाणी ५०० क्विंटल आवक झाली. पुढील काळात तुरीच्या दरात आणखी तेजी येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
तुरीच्या साठ्यावर केंद्राचे निर्बंध
सध्या तुरीचे दर वाढत असलयाने तूर डाळही महागली आहे. डाळीच्या दरात मागील तीन दिवसात ३० ते ३५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारने आता तुरीच्या साठ्यावर निर्बंध लावले असून व्यापाऱ्यांना दररोजच्या साठ्याचा हिशोब सरकारला द्यावा लागत आहे. निर्बंध लादल्या नंतर तुरीच्या दरात मंदी येईल असा अंदाज होता मात्र तो खोटा ठरवत तुरीच्या दरात तेजी कायम आहे. सरकारने वाढते दर लक्षात घेऊन तूर आयातीचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याला उशीर लागेल त्यामुळे तुरीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
मोजक्याच शेतकऱ्यांना होणार फायदा
तुरीच्या दराने उच्चाक गाठला असला तरी या दराचा मोजक्याच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कारण बहुतांश शेतकऱ्यांनी ८ हजार दर झालेले असतानाच तूर विकली आता मोजक्याच शेतकऱ्यांकडे तूर शिल्लक आहे. यावर्षी वाढलेले दर बघता तुरीच्या पेऱ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
असे होते कालचे भाव
मानोरा ९८५०-१११११
मंगरूळपीर ९५००-१०४५५