बीड: कोण अजित पवार ? असं म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा पवारांवर सडकून टीका केलीय. “मी नुसतं बोलतोय लोक आता जोड्याने मारतील”. तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने वागलात, तर लोकं आता तुम्हाला जोड्याने मारल्याशिवाय राहणार नाहीत, असं म्हणत त्यांनी यावेळी अजित पवारांवर सडकून निशाणा साधला. ते सोमवारी बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी गोपीचंद पडळकर यांनी संजय राऊत यांच्यासंदर्भातही भाष्य केले. तुम्ही पवाराच्या घरी झाडू मारायला राहिलात, हा काय प्रकार आहे ? अरे दिल्लीमध्ये देशाचे पंतप्रधान आहेत. या राष्ट्राला पुढे न्यायचं काम करतात. प्रत्येक राज्याला भरीव असा निधी देतायेत. देशाला एका अवस्थेमध्ये आणणारा पंतप्रधान इतक्या वर्षानंतर देशाला मिळालाय. जगाच्या बाजारपेठेमध्ये देशाची उंची वाढवण्याचे फार मोठे काम केले. त्यामुळे लोक काय बोलतात ? याला फार महत्व देण्याचे काही काम नाही, असे म्हणत पडळकर यांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

कार्यक्रमावर छाप, नाव घेताच टाळ्या अन् शिट्ट्या, मुख्यमंत्र्यांची शाबासकी, पडळकर ‘अहिल्यानगर’चे हिरो!

पंकजा मुंडे यांचं भाजपमध्ये व्यवस्थित सुरु आहे: पडळकर

पंकजाताई भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या आहेत. आणि माननीय संघर्षयोद्धा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या त्या कन्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या त्या मोठ्या नेत्या असल्यामुळे इतर पक्षाच्या लोकांनी काहीही चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करू नये. भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं, भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केले आहे. त्यामुळे पंकजाताईंचा विषय हा एकदम व्यवस्थितपणे चालू आहे, कोणीही चिंता करण्याची गरज नाही, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले. तर यावेळी मंत्रिमंडळाच्या विस्तारावर तो विषय माझा नाही, म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मिडियापासून काढता पाय घेतला.

पडळकरांवर प्रश्न, अजित पवारांचा पारा चढला, दादांनी थेट बारामतीचं डिपॉझिटच काढलं!

गोपीचंद पडळकरांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख

गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही नुकतीच सडकून टीका केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वपक्षीय नेते शरद पवार यांच्याकडे आदराने पाहतात. मात्र, गोपीचंद पडळकर यांनी सोलापूर येथील कार्यक्रमात शरद पवारांचा एकेरी उल्लेख करत टीकास्त्र सोडले. यावेळी गोपीचंद पडळकर वारंवार शरद पवार यांचा एकेरीत उल्लेख करताना दिसले.

राजकारण केलं तर पवार आजोबा-नातवाला पश्चाताप करण्याची वेळ आणू : गोपीचंद पडळकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here