मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने (BOB) इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल (ICCW) सुविधा सुरू केली आहे. ज्यामध्ये ग्राहक युपीआय वापरून बँकेच्या ATM मधून पैसे काढू शकतात. BOB ने निवेदनात म्हटले की UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्याची सुविधा देणारी ही सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक आहे.

डेबिट कार्डशिवाय एटीएममधून काढा पैसे
BOB ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, UPI द्वारे ATM मधून पैसे काढण्याची सुविधा देणारी ही सार्वजनिक क्षेत्रातील पहिली बँक आहे. बँकेने म्हटले की त्यांच्या ICCW सुविधेचा लाभ घेऊन भीम UPI आणि इतर UPI ऍप्लिकेशन्स वापरणारे इतर सहभागी बँकांचे ग्राहक त्यांच्या ग्राहकांसह ATM मधून पैसे काढू शकतील. बँक ऑफ बडोदा एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना डेबिट कार्ड वापरण्याची आवश्यकता नाही.

ATM मधून पैसे काढताय? मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा अन्यथा क्षणात रिकामे होऊ शकते तुमचे बँक खाते
युपीआयच्या माध्यमातून पैसे काढण्याची प्रक्रिया
या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाला बँक ऑफ बडोदाच्या एटीएममध्ये ‘यूपीआय कॅश विथड्रॉल’चा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर काढायची रक्कम टाकल्यानंतर एटीएमच्या स्क्रीनवर एक क्यूआर कोड दिसेल. व्यवहार अधिकृत करण्यासाठी ICCW साठी अधिकृत UPI ऍप वापरून हा कोड स्कॅन करावा लागेल.

चक्क एटीएममधून बोटाच्या सहाय्यानं लाखो रुपये काढले; आंतरराज्य टोळी पोलिसांच्या जाळ्यात

एका दिवसात दोनवेळा व्यवहार शक्य
बँकेचे मुख्य डिजिटल अधिकारी अखिल हांडा म्हणाले की, ICCW च्या सेवेमुळे ग्राहक डेबिट कार्डशिवाय पैसे काढण्याचे स्वातंत्र्य असतील. ग्राहक एका दिवसात दोन वेळा डेबिट कार्डाशिवाय UPI द्वारे पैसे काढू शकतात. म्हणजेच तुम्ही दिवसातून फक्त दोनदा या सुविधेचा लाभ घेऊ शकता आणि एकावेळी ५,००० रुपयांपेक्षा जास्त काढू शकता. बँक ऑफ बडोदाचे भारतात ११,००० पेक्षा जास्त एटीएम आहेत. दरम्यान, तुम्ही बँक ऑफ बडोदाचे ग्राहक नसले तरीही तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here