अहमदनगर : हिंदू समाजावर होणारे अत्याचार आणि लव्ह जिहाद विरोधात आज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने भगव्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चानंतर परतताना काही समाज कंटकांनी संगमनेर शहराजवळील समनापूर गावातील एका समाजाच्या घरावर दगडफेक केल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते.दगडफेकीत काही चारचाकी आणि दुचाकी यांचंही नुकसान झालं आहे, तर एक वृद्ध या दगडफेकीत जखमी झाल्याची माहिती आहे. अचानक दगडफेक झाल्याने घरातील महिला आणि लहान मुलं घाबरून गेले होते.

नगरमधील मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो; फडणवीस संतापले, औरंग्याचं नाव घेणाऱ्यांना…
विशेष म्हणजे या समाजकंटकांनी पोलिसांच्या समोर दगडफेक करत वाहनांचे नुकसान केले. घटनेनंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा समनापुर गावात तैनात करण्यात आला असून गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

कोणी औरंग्याचं नाव घेत असले तर माफी नाही, अहमदनगरमधील प्रकारावरून फडणवीसांनी ठणकावलं

भगवा मोर्चातून परत जाताना तरुणांच्या टोळक्याकडून दगडफेक आणि वाहनांची तोडफोड होत असल्याचे निदर्शनास येत असले तरी या वादाचे मूळ कारण मात्र समजू शकले नाही.

आईच्या डोळ्यांदेखत बापाला संपवलं, माऊलीचा आक्रोश, शेजारी येईपर्यंत २३ वर्षांचा लेक पसार
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हापोलीस प्रमुख राकेश ओला हे स्वतः घटनास्थळी पोहोचले असून गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने समनापुर गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. तसेच आमच्या गावात कोणतेही वाद नसून बाहेरील लोकांनी हे कृत्य केले आहे लवकरात लवकर या समाज कंटकांवर कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here