लोकेशन बॉक्स म्हणजे काय?
ज्या ठिकाणी रेल्वे गाड्या रुळ बदलतात, त्या ठिकाणी लोकेशन बॉक्स असतो. रेल्वे गाड्यांना योग्य मार्ग दाखवण्याचं काम इथून होतं. याच ठिकाणाहून सिग्नलची यंत्रणा कार्यरत असते. इंटरलॉकिंगची यंत्रणा सुरळीत सुरू ठेवण्यात लोकेशन बॉक्सची भूमिका महत्त्वाची असते. दोन रेल्वे गाड्या एकाच मार्गावर आमनेसामने येऊ नयेत, त्यांची धडक होऊ नये याची काळजी लोकेशन बॉक्सच्या माध्यमातून घेतली जाते.
रेल्वेच्या इंटरलॉकिंग सिस्टिममध्ये काही त्रुटी असती, तर कोरोमंडल एक्स्प्रेसला हिरवा सिग्नल मिळाला नसता. त्यामुळे संभाव्य अपघात टळला असता. पण रेल्वेच्या तंत्रज्ञानं संपूर्ण यंत्रणा मॅन्युअली ऑपरेट केल्यानं ‘फेल-सेफ लॉजिक’ फेल गेलं. यंत्रणेत झालेला बिघाड लक्षातच न आल्यानं दुर्घटना घडली.
मेन लाईनवरुन धावणारी कोरोमंडल एक्स्प्रेस इंटरलॉकिंग सिस्टिममुळे लूप लाईनवर गेली. या लाईनवर आधीच एक मालगाडी उभी होती. कोरोमंडल एक्स्प्रेसला थांबा नसल्यानं तिचा वेग ताशी १३० किमी इतका होता. याच वेगात तिनं मालगाडी धडक दिली. अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की कोरोमंडल एक्स्प्रेसचं इंजिन थेट मालगाडीवर चढलं. यानंतर कोरोमंडलचे डबे रुळांवरुन घसरले आणि शेजारच्या रुळांवर पडले. याच रुळांवरुन पुढच्या काही मिनिटांत शालिमार एक्स्प्रेस धावली. तिनं कोरोमंडलच्या डब्यांना धडक दिली. यानंतर शालिमार एक्स्प्रेसचे काही डबे रुळांवरुन घसरले.