मार्चच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला, ज्यानुसार ETF गुंतवणुकीतून मिळणारी कमाई इक्विटी किंवा संबंधित साधनांमध्ये पुन्हा गुंतवली जाऊ शकते. यासह, ईपीएफओच्या पोर्टफोलिओमधील इक्विटी घटकाचा वाटा अनुज्ञेय मर्यादा वाढवेल.
ETF मधून किती गुंतवणुकीला परवानगी?
विशेष म्हणजे, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना वेळोवेळी ईटीएफमध्ये गुंतवणूक करून नफा कमावते. वित्त मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या गुंतवणुकीच्या पद्धतीनुसार EPFO आपला निधी गुंतवते. नुकत्याच जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ईपीएफओ ETF द्वारे इक्विटीमध्ये वार्षिक ५-१५ टक्के गुंतवणूक करू शकते आणि उर्वरित रक्कम डेट सिक्युरिटीजमध्ये गुंतवली जाते. ईटीएफ रिडेम्पशनची रक्कम कशी गुंतवायची याबाबत कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. EPFO नुसार जानेवारी २०२३ पर्यंत त्यांच्या एकूण कॉर्पसमध्ये इक्विटी गुंतवणुकीचा वाटा फक्त १०% होता, तर अनुज्ञेय मर्यादा १५% आहे.
कधी आणि किती वाढली गुतंवणूकीची मर्यादा
ईपीएफओने २०१५-१६ मध्ये ETF च्या माध्यमातून इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याची मर्यादा ५% होती, जी २०१६-१७ मध्ये १०% आणि नंतर २०१७-१८ मध्ये १५% करण्यात आली. ईपीएफओची ETF मध्ये ३१ मार्च २०२२ पर्यंत एकूण गुंतवणूक १,०१,७१२.४४ कोटी रुपये होती, जी ११,००,९५३.६६ कोटी रुपयांच्या एकूण गुंतवणुकीच्या हे ९.२४% आहे. ईपीएफओ वेळोवेळी ETF मध्ये केलेल्या गुंतवणुकीची पूर्तता करते. ही रक्कम उत्पन्न म्हणून ग्राह्य धरली जाते आणि आतापर्यंत त्यातील केवळ १५% ETF मध्ये गुंतवली जाते तर उर्वरित कर्ज साधनांमध्ये गुंतवली जाते.