लंडन: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या ७ जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच सुरू होत आहे. द ओव्हल मैदानावर होणारी ही लढत चुरशीची होईल अशी आशा आहे. या मैदानाची ओळख ओव्हल अशी असली तरी त्याचे खरे नाव केनिंग्टन ओव्हलला असे आहे.ओव्हल मैदानावर प्रथमच जून महिन्यात कसोटी मॅच होत आहे. या मैदानावरील पिच कसे आहे याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. मॅचच्या आधी जाणून घेऊयात कसे आहे पिच आणि आजवर झालेल्या सामन्यातील आकडेवारी काय सांगते.

WTC Finalच्या आधी भारतासाठी आली गुड न्यूज; टीम इंडियाने गाजवले आहे ओव्हल मैदान, अखेरच्या…
‘द ओव्हल’ मैदानाच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील एक मोठा विक्रम आहे. हे मैदाना सर्वाधिक कसोटी सामने झालेल्या मैदानांच्या यादीत पहिल्या ५ मध्ये येते. असे असले तरी येथील पिच बाबत कोणताही अंदाज लावता येत नाही. पिचवर गवत दिसत असल्याने असा अंदाज लावला जात आहे की सुरुवातीला जलद गोलंदाजांना मदत मिळेल. इंग्लंडमध्ये हवामान नेहमी बदलत राहते. त्यामुळेच पिचवर गोलंदाजी आणि फलंदाजी दोघांना मदत मिळत राहते. यामुळेच टॉस जिंकणे निर्णायक ठरते.

मॅचच्या अखेरच्या दोन दिवशी पिच कोरडे होम्याची शक्यता आहे. त्यामुळे फिरकीपटूंना मदत मिळू शकते. याआधीच्या कसोटीत असे पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच अधिकतर संघ टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा पर्याय निवडतात.

WTC फायनल IND vs AUS: मॅच ड्रॉ झाली तर कोण होणार चॅम्पियन, काय सांगतो ICCचा नियम
‘ओव्हल’ खेळपट्टीबाबतचे गूढ

ओव्हलवरील खेळपट्टी कशी असेल याबाबत गूढ आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, केनिंग्टन ओव्हलला जूनमध्ये प्रथमच कसोटी सामना होत आहे. या मैदानावरील चारही खेळपट्ट्यांवर माफक गवत आहे, त्यामुळे मध्यमगती गोलंदाजीस अपेक्षित साथ मिळेल. या मैदानाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे इंग्लंडमधील अन्य खेळपट्ट्यांच्या तुलनेत फिरकी गोलंदाजांना जास्त साथ मिळते.

आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मॅचच्या आधी दोन दिवसांत खेळपट्टीवरून रोलर जास्त फिरवला जाणार का, गवताची छाटणी होणार का, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. दरम्यान पूर्ण हिरवीगार आणि पूर्णपणे फिरकी गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी टाळण्याचा प्रयत्न असल्याचे समजते. या मैदानावरील पहिल्या डावातील सरासरी २६९, तर दुसऱ्या डावातील सरासरी २८० इतकी आहे. स्क्वेअर सीमारेषा जवळ असल्याचा फलंदाजांना फायदा होऊ शकतो.

IND vs AUS: WTC फायनल जिंकायची असेल तर फक्त ही एक गोष्ट करा, इंग्लंडच्या खेळाडूचे भारताला टिप्स
ओव्हल मैदानाचे रेकॉर्ड

एकूण मॅच- १०४
होम टीम (इंग्लंड)चा विजय- ४३ वेळा
प्रथम फलंदाजीकरून विजय- ३७ वेळा
पाहण्या संघाचा विजय- २३ वेळा
ड्रॉ मॅच- ३७
सर्वोच्च धावसंख्या- १९३८ इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा ७ बाद ९०३
सर्वात कमी धावसंख्या- ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडचा ४४ धावांवर ऑलआऊट
पहिल्या डावातील सरासरी- ३४३
दुसऱ्या डावातील सरासरी- ३०४
तिसऱ्या डावातील सरासरी- २३८

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here