ठाणे : राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ठाण्यातील माजिवाडा परिसरात यशस्वी नगर येथे एका सहा वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. या घटनेची माहिती मिळताच कापूरबावडी पोलिसांनी कसोशीने तपास करून मूळचा पश्चिम बंगालचा असलेल्या आणि पेशाने मिस्त्री असलेल्या आरोपीला मुंबईच्या माहीम येथून अटक केली आहे.
Pune News : पुण्यात बापाचं बेकायदा कृत्य मुलीच्या जीवावर बेतलं; सिलिंडरमधून गॅस भरताना स्फोटात मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका सहा वर्षीय चिमुकलीवर एका ४५ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची घटना सोमवारी ५ जून रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पीडित चिमुकली सायंकाळी ४.३० च्या सुमारास रडताना काही नागरिकांना दिसली. तिचा रक्तस्राव होत असल्याचे आढळल्यानंतर तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा हा घृणास्पद प्रकार उघड झाला. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. याबाबत ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक! वडापाव आणायला गेलेल्या चिमुरडीवर अत्याचार; दुकानदाराला ठोकल्या बेड्या

या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता कापूरबावडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे यांनी त्वरित या प्रकरणाच्या तपासासाठी पथक रवाना केले. या पथकाने तात्काळ आरोपीचा शोध सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव चुरका शरन (छोरने) उर्फ दादू (४५) आहे. आरोपीला ट्रेस करून कापूरबावडी पोलिसांनी मुंबईच्या माहीम या परिसरातून अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आरोपी विरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पीडित मुलीला उपचारासाठी ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं समजले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here