नवी दिल्ली : वाढत्या महागाईच्या काळात गृहकर्ज घेणे किंवा म्युच्युअल फंडात SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करणे, हे दोन्ही वैयक्तिक आर्थिक निर्णय आहेत, जे व्यक्तीच्या गरजांवर आधारित असतात. एकीकडे तुम्ही SIP च्या माध्यमातून नियमित अंतराने छोट्या प्रमाणात मासिक गुंतवणूक सुरू करू शकता, जी जमा होऊन काही काळानंतर एकत्रित मोठ्या रकमेत रूपांतरित होईल आणि तुम्ही तुमच्या भविष्यतील गरजा पूर्ण करू शकता. याउलट गृहकर्ज घेतले तर त्याचे आपले वेगळे फायदे आहेत. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचं स्वतःच घर घेऊ शकता, कर बचत, तुमची क्रेडिट मर्यादा वाढवणे, मालमत्ता वाढवणे आणि भाड्यात बचत करणे.

करोडपती बनायचे आहे तर म्युच्युअल फंडात किमान किती रक्कम गुंतवायची? समजून घ्या एकूण हिशोब
आर्थिक सल्लागारांच्या म्हणण्यानुसार तुम्ही साधारणपणे वार्षिक आधारावर तुमची SIP किमान १०% वाढवावी. तुमची SIP वाढवून तुम्ही फक्त उच्च चलनवाढीपासून बचाव करत नाही, तर तुमच्या परिभाषित आर्थिक उद्दिष्टांकडे वेगाने वाटचाल कराल. मात्र, या दोघांना केंद्रस्थानी ठेवून येत्या काही महिन्यांत जेव्हा तुमच्या पगारात वाढ होऊन पैशाचा ओघ वाढेल तेव्हा यापैकी कोणत्या पर्यायात अधिक पैसे गुंतवणे अधिक फायदेशीर ठरेल हे आपण पाहूया.

SIP Investment: तरुणांनो, दिवसाला करा ३३३ रुपयांची बचत; निवृत्तीला मिळेल ३.५ कोटी रुपयांचा बँक बॅलेन्स
SIP की गृहकर्जाच्या ईएमआय
दोन्हीमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा निर्णय जरी वैयक्तिक असला तरी तरीही काही गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ तुम्ही २० वर्षांसाठी ८.५% व्याज दराने ५० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले असेल, तर तुमचा मासिक EMI ४२,३९१ रुपये असेल आणि तुम्ही व्याज म्हणून एकूण ५४,१३,८९७ रुपये भराल. अशा स्थितीत तुमच्या उत्पन्नातील वार्षिक वाढीच्या अनुषंगाने तुमचा EMI दर वर्षी ५% ने वाढवण्याचा विचार करा, जे तुम्हाला व्याज खर्चावर रु. १९.५ लाखांपर्यंत बचत करण्यास मदत करेल.

करोडपती बनायचंय तर SIP मध्ये दरमहिना किती गुंतवणूक कारवी लागेल? समजून घ्या गणित…
तुमच्या कर्जाचा कालावधी सुमारे ७.५ वर्षांनी कमी होईल. तसेच, आयकर नियमांनुसार तुम्ही एका आर्थिक वर्षात भरलेल्या मूळ रकमेवर कलम ८०इ अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत कर कपातीचा दावा करू शकता. तसेच, कलम २४(बी) अंतर्गत तुम्ही व्याजाच्या रकमेवर दोन लाखांपर्यंत कपातीचा दावा करू शकता.

निवृत्तीनंतरची तरतूद कशी करावी?

SIP गुंतवणुकीचे फायदे
दुसरीकडे, समजा तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडात २० वर्षांसाठी दरमहा ४०,००० रुपयाची SIP सुरू केली. यावर १२% चा CAGR गृहीत धरून तुम्ही तुमच्या उत्पन्नातील वार्षिक वाढीसह SIP मधील गुंतवणूक ५% वाढवण्याचा निर्णय घेतला. असे केल्यास तुम्हाला २० वर्षानंतर ५,४९,५०,४९३ रुपयांचा निधी तयार होईल. म्हणजे तुम्हाला १,५८,७१,६५८ रुपयांच्या गुंतवणुकीवर ३,९०,७८,८३५ रुपयांचा नफा होऊ शकतो. याउलट जर तुम्ही SIP मध्ये ५% वाढ केली नाही, तर हा नफा फक्त ३,०३,६५,९१७ लाख रुपये असेल. अशा स्थितीत तुमच्या एकूण नफ्यात ८७,१२,९१८ रुपयाचे नुकसान होईल. त्यामुळे तुम्हाला पगार वाढ झाल्यावर तुमची गुंतवणूक कुठे वाढवायची आहे, हे तुम्ही ठरवू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here