पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत वाढत आहे. दररोज बिबटे नागरिकांच्या निदर्शनास पडत आहेत. निरगुडसर येथे रामदास वळसे पाटील यांच्या घराच्या व्हरांड्यात चक्क बिबट्या शिकारीच्या शोधात आला होता. मात्र त्याला शिकार काही मिळेना. बराच वेळ तिथेच घुटमळल्यानंतर बिबट्याने त्या व्हरांडतील चक्क चप्पल चोरून नेली आहे. घरातील सीसीटीव्ही मध्ये हा प्रकार कैद झाला आहे. त्यानंतर याचा व्हिडिओ समोर आला. सद्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
चिकूच्या बागेत काम करत असताना अचानक बिबट्याने मजूरावर केला हल्ला

बिबट्याचे मानवी वस्तीकडे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य वाढू लागले आहे. त्यामुळे दिवसा घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. आंबेगाव तालुक्यात प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरासमोर बिबट्या पासून बचावासाठी भिंती उभारल्या आहेत. मात्र अनेकदा बिबट्या भिंतीवरून चढून आत प्रवेश केल्याचे देखील आपण पाहिले आहे. मात्र निरगुडसर येथे एका शेतकऱ्याचा घरा बाहेर बिबट्या शिकारीच्या शोधता आला पण त्याला शोधूनही शिकार मिळेना. अखेर त्याने घराच्या व्हरांड्यात असलेल्या शेतकऱ्याची चप्पलच पळवून नेली. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने अनेकांनी आश्चर्याने डोक्याला हात मारला. अनेकांना हसू देखील आवरेना. त्यामुळे अनेक चर्चा यावर होऊ लागल्या आहेत.

भल्या भल्यांना घाम फोडणाऱ्या बिबट्याने चक्क चोरली चप्पल

जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यात बिबट्याचे मोठे साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत बिबट्यांनी अनेक नागरिकांवर हल्ले केले. अनेकजण त्यात मृत्युमुखी पडले, कित्येक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे या भागात बिबट्याची दहशत पहिल्यापासून पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी सहा ते सात फूट भिंतीवरून बिबट्याने घरासमोर बसलेल्या बिबट्याची शिकार केली होती. त्यामुळे बिबट्याची दहशत असल्याचे समोर आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here