पत्नीच्या चारित्र्यावर संशय, घरात रोज भांडणं
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या डोंगर हळदी गावातील मनोज लेनगुरे हा पत्नी आणि दोन मुलींसोबत राहत होता. मात्र, मनोजच्या मनात आपल्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल दिवसेंदिवस संशय वाढू लागला. या संशयातून घरात रोज भांडण व्हायची. संशयाने मनोजच्या डोक्यात घर केलं होतं. या संशयाला पूर्णविराम देण्यासाठी आरोपी मनोजने भरदिवसा पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले. या घटनेच पत्नी गंभीर जखमी झाली.
पत्नीवर कुऱ्हाडीने वार, मुलींनाही सोडलं नाही
कुऱ्हाडीने वार केल्यानंतर पत्नी रक्ताचा थारोड्यात पडली होती. हे सारं बघून घाबरलेल्या मुली तिला वाचवायला धावल्या. पण, पत्नीवर वार केल्यानंतरही मनोजचा राग शांत झालेला नव्हता. त्याने मदतीसाठी धावलेल्या दोन मुलींवर हल्ला केला. ज्यामध्ये त्या गंभीररित्या जखमी झाल्या.
आशा मनोज लेनगुरे असे मृतक महिलेचे नाव आहे. तर पूनम आणि अंजली या दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी मनोज लेनगुरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.