जालना : कालच्या राष्ट्रवादीच्या झालेल्या बैठकीतनंतर आज जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे शरद पवार यांनी भेट दिली. जाफराबादच्या राष्ट्रवादीच्या सुरेखाताई लहाने यांच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार चंद्रकांत दानवे उपस्थित होते. कालच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत लोकसभेच्या तयारीचे संकेत मिळाले असून जालना लोकसभेसाठी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नावाची चर्चा झाल्याचे पुढे आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आजची शरद पवार यांची जाफराबाद येथील सदिच्छा भेट नक्कीच काही तरी संकेत देत असल्याच्या चर्चा होत आहेत.

लोकसभेच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून माजी खासदार पुंडलिक हरी दानवे यांचे पुत्र माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या नावाची चर्चा झाल्याने जालन्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. ५ वेळा लोकसभा निवडून येणाऱ्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या समोर चंद्रकांत दानवे यांच्या रूपाने नव्या उमेदवाराची चर्चा सुरू झाली आहे.

विरारमध्ये मोठी दुर्घटना; इमारतीचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळली, ३ महिला कामगारांचा मृत्यू
अर्थात चंद्रकांत दानवे हे राष्ट्रवादीचे असले तरी मविआची आघाडी झाल्यावर ही जागा काँग्रेसकडे जाईल की राष्ट्रवादीकडे, की उध्दव ठाकरे यांच्या उमेदवाराकडे हे अजून स्पष्ट झाले नाही. पण कालच्या चंद्रकांत दानवेंच्या नावाच्या चर्चेने राजकीय समीकरणे काय असतील याचे आखाडे आता लोक बंधू लागले आहेत.

जालना लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा पाच वेळा पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेससाठी जालना लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी योग्य राहील. आपण तेथून लढायला हवे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांसमोर व्यक्त केले.

WTC Final : रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया बनणार वर्ल्ड चॅम्पियन, WTC फायनलमध्ये आश्चर्यकारक योगायोग
राष्ट्रवादी काँग्रेसला २०१९ मध्ये औरंगाबाद मतदारसंघ हवा होता. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार सतीश चव्हाण हे लोकसभेसाठी आग्रही होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्याकडे तसा प्रस्ताव ठेवला होता. परंतु स्थानिक नेत्यांनी हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला होता. त्यानंतर काँग्रेसने ही जागा लढवली होती. भाजपचे रावसाहेब दानवे यांनी मोठ्या मताधिक्याने त्यांचा पराभव केल्याने यावेळेस राष्ट्रवादी आग्रही असेल असे चित्र सध्या दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या दौऱ्यात शरद पवार काय भूमिका घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ओडिशा रेल्वे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी रिलायन्स फाऊंडेशन आले पुढे, १० मोठ्या निर्णयांसह नोकरी देण्याची घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here