विराट कोहली क्रिकेट विश्वात इतिहास रचणार
७ जून ते ११ जून दरम्यान इंग्लंडच्या केनिंग्टन ओव्हल (लंडन) मैदानावर होणार्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११२ धावा केल्या तर तो ICC नॉकआऊट सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. विराट कोहलीने हा महान विक्रम केला तर तो क्रिकेट विश्वात इतिहास रचेल.
WTC फायनलमध्ये हा महान विक्रम करेल
जर विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात११२ धावा केल्या तर तो सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडेल. सध्या ICC बाद फेरीत सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंगच्या नावावर आहे. रिकी पाँटिंगने ICC नॉकआऊट सामन्यात १८ डावात ७३१ धावा केल्या आहेत. या यादीत क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकरने ICC बाद फेरीत १४ डावात ६५८ धावा केल्या आहेत.
विराट कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५,३२२ धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक ३४,३५७ धावा केल्या आहेत.
ICC बाद फेरीत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
- रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – १८ डावात ७३१ धावा
- सचिन तेंडुलकर (भारत) – १४ डावात ६५८ धावा
- विराट कोहली (भारत) – १५ डावात ६२० धावा