कल्याण : कल्याणच्या पत्रीपुलाशेजारी दोन दुचाकी वाहनांची धडक झाल्याच्या कारणावरून दोन्ही वाहनचालकांमध्ये तुफान राडा झाला आहे. दोन्ही वाहनचालक आणि त्यांच्या सोबत असलेल्या महिलांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी सुरू झाली. भर चौकातच एकामेकांना मारहाण सुरू झाल्याने बघ्यांची गर्दी जमा झाली. तब्बल वीस मिनिटं ही हाणामारी सुरू होती. काही वेळाने वाहतूक पोलीस व पोलिसांच्या मदतीनंतर ही परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान या फ्री स्टाइल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.ट्रॅफिक पोलिसांसमोरच झाली हाणामारी
कल्याण पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा तिसाई माता पूल (पत्रिपुल) ते दुर्गाडी किल्ल्याला जोडणाऱ्या गोविंद बायपास रोडवर आज सायंकाळी साडेसात ते सातच्या दरम्यान दोन दुचाकी वाहनाची धडक झाली. या धडकेनंतर चुकी कोणाची हे न पाहता दोन्ही वाहन चालकांमध्ये भर रस्त्यातच तुडुंब हाणामारी सुरू झाली. विशेष म्हणजे हे ट्रॅफिक पोलिसांसमोरच झाले.

२० मिनिटं सुरू होती फ्री स्टाइल हाणामारी
वाहन चालकांची हाणामारी होत असतानाच त्यांच्या पाठीमागे बसलेल्या दोन्ही महिलाही आपसामध्ये एकामेकींना भिडल्या. या महिलांचे भांडण सोडवण्यासाठी इतर प्रवासी प्रयत्न करू लागले. ही फ्री स्टाईलमध्ये सुरू असलेली हाणामारी तब्बल वीस मिनिटं सुरू होती. महिलाची हाणामारी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती.
या घडलेला प्रकाराची माहिती एका वाहतूक पोलिसाने महिला अंमलदार यांना कळवले. माहिती मिळतात महिला अंमलदार यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण आणत वाहतूक कोंडी सुरळीत केली. ही फ्री स्टाईलची हाणामाऱी प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केली असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ती वायरल होत आहे. दरम्यान, हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.