मुंबई: मरीन ड्राइव्ह येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका २० वर्षाच्या तरुणीचा विवस्त्र स्थितीत मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याचा अंदाज असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेपासून वसतिगृहाचा सुरक्षारक्षक गायब होता. त्यानेच हे कृत्य केल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र, ही बातमी समोर येताच या गुन्ह्यातील आरोपी सुरक्षारक्षक प्रकाश कनोजिया याने ग्रॅन्ट रोड आणि चर्नी रोड स्थानकादरम्यान ट्रेनखाली उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या याप्रकरणी तसाप सुरु आहे.

मरीन ड्राइव्ह येथे तारापोरवाला मस्त्यालयाच्या शेजारी सावित्रीबाई फुले वसतिगृह असून देशभरातून मुंबईत शिकण्यासाठी येणाऱ्या तरुणींना राहण्यासाठी या वसतिगृहात व्यवस्था आहे. पॉलिटेक्निकलमध्ये शिकणारी अकोल्याची ही तरुणी गेल्या काही दिवसांपासून या वसतिगृहात राहत होती. चौथ्या मजल्यावर वास्तव्यास असलेली ही तरुणी मंगळवारी सकाळपासून खोलीबाहेर न आल्याने इतर तरुणी तिच्या खोलीजवळ गेल्या.

Odisha Train Accident: कोरोमंडलचा एक डबा झुडपात जाऊन उलटला, तो तिथेच अडकून पडला, ४८ तासांनी अखेर…
खोलीच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावलेली होती. कडी उघडून पाहिले असता ही तरुणी खोलीमध्ये विवस्त्र अवस्थेत आढळली. तरुणींनी वसतिगृहाच्या व्यवस्थापनाला कळवताच त्यांनी याबाबतची मरीन ड्राइव्ह पोलिस घटनास्थळी पोहोचले. ओढणीने गळा आवळून तिची हत्या करण्यात आली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. वैद्यकीय अहवालानंतर तिच्यावर बलात्कार झाला की नाही हे स्पष्ट होईल असे पोलिसांनी म्हटले आहे.

Mumbai Crime: मुंबईत आईची हत्या करुन मुलाने स्वत:ला संपवलं, घरातील भयंकर दृष्य पाहून वडिलांचा आक्रोश
या वसतिगृहात अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या सुरक्षारक्षकावर पोलिसांचा संशय होता. मंगळवारी सकाळपासून सुरक्षारक्षक प्रकाश कनोजिया हा गायब होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, त्याने ग्रॅन्ट रोड आणि चर्नी रोड स्थानकादरम्यान ट्रेनखाली उडी घेत आत्महत्या केली आहे. दरम्यान, पोलिस पकडू नयेत म्हणून त्याने स्वतःचा मोबाइल देखील वसतिगृहात ठेवला होता. तरुणीच्या खोलीच्या दरवाजाची कडी बाहेरून लावत असताना सुरक्षारक्षक दिसत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितलं.

ही तरुणी विदर्भातील अकोल्याची असल्याची माहिती आहे. ती काहीच दिवसात तिच्या मूळ गावी जाणार होती. त्यासाठी तिने गाडीचं तिकीटही बुक केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, त्यापूर्वीच तिचा असा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. या घटनेने वसतिगृहासह परिसरात एकच खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here