मुंबई: प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विरोधी पक्ष भाजपनं ठाकरे सरकारला घेरल्यानंतर शिवसेनेचे खासदार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांची ही प्रतिक्रिया अत्यंत सावध आहे. ()

वाचा:

‘सुशांतसिंह प्रकरण सीबीआयकडे देण्याचा जो निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे, त्यावर महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल आणि मुंबईचे पोलीस आयुक्तच बोलू शकतील. महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. मोठी परंपरा असलेलं राज्य आहे. सत्य व न्यायासाठी संघर्ष करणारं हे राज्य आहे. या राज्यानं कधीही कुणावर अन्याय केलेला नाही. या संदर्भातील संपूर्ण निकालपत्र हाती आल्याशिवाय त्यावर मत व्यक्त करणं योग्य नाही,’ असं राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

वाचा:

मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं हे षडयंत्र आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत प्रामाणिकपणे केला आहे. त्यांची प्रतिष्ठा जगभरात आहे. मुंबई पोलिसांना आपल्याच राज्याचे राजकारणी बदनाम करत असतील तर ते या राज्याचे खच्चीकरण करताहेत,’ अशी टीकाही त्यांनी केली. सर्वोच्च न्यायालयानं एकदा निर्णय दिल्यानंतर त्यावर राजकीय टिप्पणी करणं योग्य नाही, असं राऊत म्हणाले.

वाचा:

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत आहे. ‘अशी मागणी करणं हेच मुळात चुकीचं आहे. या प्रकरणात सर्वांनीच जपून मत व्यक्त करावं,’ असं राऊत म्हणाले. राजीनाम्याचीच चर्चा करायची झाली तर ती दिल्लीपर्यंतच्या नेत्यांचीही होऊ शकते,’ असंही ते म्हणाले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here