म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांनी आता थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी मंगळवारी प्रभादेवी, दादर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातील शाखांना भेटी देत तेथील शिवसैनिकांशी संवाद साधला.आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना शाखा संपर्क अभियान सुरू केले असून, ते मुंबईतील विविध शाखांना भेट देत आहेत. यानिमित्त ते शिवसैनिकांशी चर्चा करत आहेत. याअंतर्गत त्यांनी प्रभादेवी, दादर शाखांना भेट दिली. शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांचे कार्यालय हे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाच्या दारासमोरच आहे. त्या कार्यालयालाही त्यांनी भेट दिली.

मागील काही दिवसांपासून खासदार शिंदे यांनी मुंबईतील शिवसेना शाखांच्या भेटी वाढवल्या आहेत. याआधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देत ठाण्यातून निवडणूक लढण्याची भाषा केली होती. सर्वसामान्य शिवसैनिक कुणाच्या मागे आहेत हे एकदा पाहूयाच, असेही त्यांनी यावेळी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर आता खासदार शिंदे हे सक्रिय झाले असून, त्यांनीही ‘सामना’च्या दारातील शाखेला भेट देत थेट उद्धव यांनाच आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कोणत्याही क्षणी, तर ठाकरे गटाच्या नेत्याने केला वेगळाच दावा
‘त्या’ जागा शिवसेनाच लढवणार!

खासदार शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघावर भाजपकडून दावा करण्यात आल्याबाबतचा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला असता, ‘कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार उभा करणार असे कोण म्हणाले त्याचे नाव घ्या’, असा उलट प्रश्न त्यांनी विचारला. ‘भाजप नेत्यांचे जे लोकसभानिहाय दौरे आहेत, ते केंद्राकडून देण्यात आले आहेत. जिथे जिथे शिवसेनेचे खासदार आहेत, त्या ठिकाणची जागा शिवसेनाच लढवणार’ असे त्यांनी यावेळी नमूद केले.

राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदेंचे भाऊ ऋषी शिंदेंच्या हाती एकनाथ शिंदेंचा भगवा

‘ठाकरे गटाला लवकरच खिंडार’

एकीकडे पर्यावरणाच्या बाता मारायच्या आणि दुसरीकडे २५ वर्षे महापालिका हातात असूनही घाण पाणी समुद्रात सोडायचे ही ठाकरेंची दुटप्पी भूमिका आहे. पालिका हातात असताना यांनी काहीच केले नाही, आता पर्यावरणाच्या नावाखाली मेट्रोला विरोध करत आहेत, अशी टीका खासदार शिंदे यांनी केली. येत्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते प्रवेश करणार असून, ठाकरे गटाला खिंडार पडणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
लघु उद्योगांसाठी खुशखबर; केंद्रीय मंत्र्यांच्या सुचनेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here