वाचा:
सुरुवातीला बॉलिवूडमधील व्यावसायिक स्पर्धेपर्यंत मर्यादित असलेल्या सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ठाकरे सरकारमधील एका मंत्र्यावर आरोप झाल्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागले होते. भाजपच्या कुठल्याही नेत्याने थेट नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर होता. शिवसेना व ठाकरे कुटुंबाशी राजकीय हाडवैर असलेले भाजपचे खासदार नारायण राणे यांचे दोन्ही सुपुत्र आमदार नीतेश राणे व माजी खासदार नीलेश राणे यांनी या संदर्भात अनेकदा थेट ट्वीट केले होते. सातत्यानं आरोप होऊनही राज्य सरकारनं हे प्रकरण सीबीआयला देण्यास नकार दिला होता. मुंबई पोलीस व्यवस्थित तपास करत असून इतर कुठल्याही यंत्रणेमार्फत तपासाची गरज नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं होतं. त्यानंतरही सीबीआय चौकशीची मागणी थांबत नव्हती. सर्वोच्च न्यायालयानं मात्र सुशांत प्रकरणाचा तपास सीबीआयकडं देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळं भाजप आता आणखी आक्रमक झाला आहे. भाजपच्या नेत्यांकडून तिखट प्रतिक्रिया येत आहेत.
नीतेश राणे यांनीही केवळ काही शब्दांचं ट्वीट केलं आहे. ‘अब बेबी पेंग्विन तो गियो… इट्स शो टाइम’ असं त्यांनी म्हटलं आहे. #JusticeForSSR असा हॅशटॅगही त्यांनी वापरला आहे. त्यांचा रोख नेमका कुणावर आहे याबाबत आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times