नवी मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत असताना प्रति बालाजी मंदिराच्या निर्मितीसाठी नवी मुंबईतील जागा देण्याचा निर्णय झाला होता. तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रतिकृतीच्या उभारणीसाठी आज भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, मिलिंद नार्वेकर आणि तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते. नवी मुंबईतील उळवे नोड येथील जागा मंदिर उभारणीसाठी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारनं ५०० कोटी रुपयांची जागा या मंदिराच्या उभारणीसाठी दिली आहे.

तिरुपती बालाजी देवस्थानला या ठिकाणी १० एकर जमीन देण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना लाभलं. आपण सगळे भाग्यशाली असून सर्वांना आनंद देणारा दिवस आहे. तिरुपती बालाजी मंदिर आहे तसंच मंदिर इथं बांधलं जाणार आहे ही आपल्यासाठी मंगलदायी वेळ आहे. महाराष्ट्रासाठी ही मोठ्या गौरवाची बाब आहे. सर्वांना तिरुपतीला जायचं असतं लोक तिकडे जाऊ शकत नाहीत.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कोणत्याही क्षणी, तर ठाकरे गटाच्या नेत्याने केला वेगळाच दावा
आता प्रत्येकाला या ठिकाणी बालाजीचं दर्शन घेता येईल. आजचा हा दिवस आनंदाचा आहे.नवी मुंबई आणि महाराष्ट्रात समृद्धी, सुख शांती आणि सर्वांना आशीर्वाद तिरुपती बालाजीचे लाभतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आमच्या सरकारच्या माध्यमातून सर्व सहकार्य करु,असं एकनाथ शिंदे म्हणाले. चांगलं काम व्हावं यासाठी प्रयत्न करत आहोत. तुम्ही महाराष्ट्रात मंदिर बनवण्याचा संकल्प केला हे आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. अनेक लोकांची इच्छा तिरुपती बालाजीला पोहोचायची इच्छा असते. आज तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्टनं संकल्प केला आहे त्यामुळं त्यांना धन्यवाद दिलेले आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.
Crime: ट्रेनचं तिकीटही काढलं होतं, पण घरी जायची इच्छा अधुरीच, मुंबईच्या हॉस्टेलमध्ये तरुणीची वॉचमनकडून हत्या

तिरुपती तिरुमाला मंदिर व्यवस्थापनानं दोन वर्षांपूर्वी नवी मुंबईत बालाजी मंदिराची प्रतिकृती उभारण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं तिरुपती तिरुमाला मंदिर व्यवस्थापनालाउळवे नोड येथील ५०० कोटींची जागा दिली होती. या मंदिराच्या उभारणीसाठी ७० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळ ही जागा आहे.
‘इथं तरी तुमच्यात एकमत झालं!’ न्यायाधीशांच्या टिप्पणीने फाटाफूट झालेल्या राजकीय नेत्यांत हशा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here