सुशांतसिंह प्रकरणावरून राष्ट्रवादीत मतभिन्नता झाल्याचे दिसून आली होते. पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केल्यानंतर पक्षाध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पार्थ यांच्या या भूमिकेला कवडीची किमंत देत नसल्याचे म्हटले होते. त्यावेळही त्यांचे दुसरे नातू रोहीत यांनी संयमीत प्रतिक्रिया व्यक्त केली होती. आज सुप्रिम कोर्टाचा निकाल आल्यानंतर काही क्षणातच पार्थ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. यावर रोहित यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष लागले होते.
रोहित पवार यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
‘सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर आहे. सुशांतसिंगला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. तसंच या प्रकरणात राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीचा मला आदर असून माझा या संस्थेवर पूर्ण विश्वास आहे. शबरीमला मंदिर प्रवेशाच्या निकालावेळी भाजपाचे मोठे नेते सुप्रीम कोर्टवर टीका करत होते, याचा आज सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजप नेत्यांना कदाचित विसर पडलेला दिसतो. पूरक भूमिका नसेल तर एखाद्या संस्थेवर टीका करण्याचे राजकीय संस्कार आमचे नाहीत.’ असंही ते म्हणाले आहेत.
वाचाः
तसंच, ‘आधी कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा आणि राज्यातील सत्ता गमावल्यानंतर मेरा अंगण मेरा रणांगण या घोषणेतून तर आता सुशांतसिंह प्रकरणातून भाजपने राज्याचा नावलौकिक घालवण्याचंच काम केलं आहे., असं ही ते म्हणाले. तर, सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासात कोणताही दोष नसल्याचं न्यायालयानेच स्पष्ट केलं आहे. पण यानिमित्तानं बिहारची राजकीय पोळी भाजण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं उद्दात्त कार्य केल्याबद्दल भाजपच्या नेत्यांना साष्टांग दंडवत,’ अशी खोचक टीका रोहित पवार यांनी यावेळी केली.
वाचाः
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times