सोने-चांदीचा आजचा भाव
बुधवार, ७ जून रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने आणि चांदीच्या किमती घसरणीसह व्यवहार करत आहेत. सोन्याचे फ्युचर्स ४५ रुपये किंवा ०.०८% टक्क्यांनी किरकोळ घसरणीसह ५९ हजार ९७७ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहेत. तर सोन्याचे फ्युचर मागील सत्रात ५९ हजार ९८५ रुपयांवर स्थिरावले होते. त्याच प्रमाणे चांदीच्या फ्युचर्समध्ये आजच्या सुरुवातीच्या व्यवहार सत्रात १०५ रुपये किंवा ०.१५% घसरण झाली असून MCX वर ७१,९५६ रुपयांच्या आधीच्या बंदच्या तुलनेत ७१ हजार ८८८ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
दरम्यान, यापूर्वी,सोन्याने ४ मे २०२३ रोजी सर्वकालीन उच्चांक गाठला आणि सोन्याचा भाव ६१६४६ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला होता. तर चांदी ४,५६० रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकाच्या खाली व्यवहार करत आहे. ४ मे २०२३ रोजी चांदीने ७६४६४ रुपयांचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत
अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हच्या पुढील व्याजदर निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कमकुवत डॉलर इंडेक्समुळे बुधवारी सोन्याच्या किमतीत वाढ झाली. स्पॉट गोल्ड ०.१% वाढून $१,९६३.८६ प्रति औंस झाले. तर स्पॉट चांदी ०.१% घसरून $२३.५६५१ प्रति औंस झाला. पुढील आठवड्यातील यूएस फेडरल व्याजदर निर्णय हा एक महत्त्वाचा घटक आहे जो सोन्याच्या किमतींवर परिणाम करेल. गेल्या वर्षभरापासून वाढलेल्या महागाईला आळा घालण्यासाठी फेडरल रिझर्व्हसह जगभरातील सर्व केंद्रीय बँका व्याजदरात वाढ करत आहे. अशा स्थितीत पुढील आठवड्यात फेड रिझर्व्हच्या व्याज दरांबाबतच्या निर्णयाकडे कमोडिटी मार्केटचे लक्ष लागून असेल.