मुंबई: उत्तर प्रदेशातील येथील बांसा गावा दलित सरपंच उर्फ पप्पू राम यांची गोळ्या झाडून क्रूर हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील दलितांच्या या वाढत्या हल्ल्यांची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली असून या विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ऊर्जा मंत्री डॉ. हे प्रत्यक्ष उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जात आहेत. डॉ. राऊत हे सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करणार आहेत.

वाचा:

उत्तर प्रदेशातील एका दलित सरपंचाची क्रूर पद्धतीने हत्या झाली ही चिंतेची बाब आहे. उत्तर प्रदेशात दलित सुरक्षित नसल्याची भावना यामुळे सर्वत्र निर्माण झाली आहे. या स्थितीत उत्तर प्रदेशातील दलित समुदायाला विश्वास देण्यासाठी डॉ. नितीन राऊत स्वतः या पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत. त्याचवेळी काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी याप्रकरणाची सत्यस्थिती जाणून घेण्यासाठी एक सत्यशोधन समिती या गावात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीत राऊत यांचा समावेश आहे.

पप्पू राम यांच्या हत्येआधीही उत्तर प्रदेशात दलितांवर जीवघेणे हल्ले झालेत. दलितांवर अनेक गंभीर स्वरूपाचे अत्याचार करण्यात आले आहेत.
डॉ. राऊत यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या प्रमुख पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या विभागाने देशभर होणाऱ्या दलितांवरील अत्याचाराविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. देशभरातील दलितांच्या मदतीसाठी हा विभाग तत्परतेने कार्यरत झाला असून दलितांना तात्काळ न्याय मिळावा यासाठी सुद्धा हा विभाग पुढाकार घेत आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेशातील या गंभीर प्रकरणासाठी सत्यशोधन समितीत महाराष्ट्रातील मंत्री नितीन राऊत यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

वाचा:

महाराष्ट्रात यापूर्वी झालेले खैरलांजी हत्याकांड असो वा मराठवाड्यातील दलित अत्याचार प्रकरण असो, या सर्वच प्रकरणात डॉक्टर राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यात मोठी भूमिका वठवली आहे. त्यामुळे या सत्यशोधन समितीकडून उत्तर प्रदेशात दलितांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल वस्तुस्थिती समोर येणार आहे. यात सरकारी यंत्रणा किंवा उत्तर प्रदेशातील सत्तारूढ पक्ष यांचा काही संबंध आहे का, हे सत्यही त्यात बाहेर येईल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

भाजपशासित राज्यात दलितांवर वाढते हल्ले

देशात भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये दलितांवर हल्ल्यांची संख्या वाढत असल्याचे खुद्द केंद्र सरकारच्या अखत्यारितील राष्ट्रीय गुन्हे अभिलेख संस्थेने म्हटले आहे. दलितांवर सर्वाधिक हल्ले आणि अत्याचार उत्तर प्रदेशात होत असून त्या खालोखाल गुजरातचा क्रमांक आहे. उत्तर प्रदेशात दलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संख्येत २०१४, २०१८ अशा चार वर्षात ४७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच कालावधीत गुजरात मध्ये दलितांवरील अत्याचारांमध्ये २६ टक्क्यांनी, हरयाणात १५ टक्क्यांनी तर मध्य प्रदेशात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय महाराष्ट्रात भाजपची सत्ता असताना २०१४ ते १८ या काळात दलितांवरील अत्याचारात ११ टक्क्यांनी वाढ झाली होती.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here