सातारा : गावी आलेल्या बारावीतील युवकाचा कोयना धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गाळात रूतून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. सायंकाळी उशिरापर्यंत बेपत्ता युवकाचा शोध सुरू होता. या घटनेची नोंद कोयनानगर पोलीस ठाण्यात झाली आहे. ( Satara Breaking News)

Dombivli News: कुत्रा तलावाकडे पाहून सतत भुंकत होता, अशुभाची जाणीव होताच फायरब्रिगेडला बोलावलं अन्

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोयना विभागातील गाडखोप येथील कदम कुटुंबीय हे कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास आहे. अर्जुन हा मुंबईमध्ये बारावीत शिक्षण घेत होता. उन्हाळी सुट्टी निमित्ताने अर्जुन शरद कदम हा युवक आपल्या गावी गाडखोप येथे आला होता. मंगळवारी दुपारच्या सुमारास अर्जुन हा आपल्या मित्रांसोबत गाडखोप गावानजीक असलेल्या कोयना धरणाच्या भिंतीलगतच्या उजव्या तीरानजीक बाजे गावच्या हद्दीत बॅकवॉटरमध्ये पोहण्यास गेला होता.

पुण्यातील कुटुंब कोकणात फिरायला आलं, चिमुकला रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये पडला अन् बघता बघता पाण्यात बुडाला

सध्या कोयना धरणाच्या बॅकवॉटरमधील पाणी मोठया प्रमाणात कमी झाले आहे. पाण्यात पोहताना त्याला पाण्यातील जमिनीतील मातीमिश्रित गाळाचा अंदाज न आल्याने तो तेथेच रूतून बुडाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अर्जुन बुडत असल्याचे इतर युवकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अर्जुनला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. या घटनेची माहिती समजताच तात्काळ ग्रामस्थ, पोलीस व वन विभागाच्या बोटीसह संबंधितांनी घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत त्याला शोधण्याची मोहीम सुरू होती. अर्जुन बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेमुळे कुटुंबीयांसह संपूर्ण गाव व विभागात शोककळा पसरली आहे. या घटनेची नोंद कोयनानगर पोलिसात झाली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here