म. टा. प्रतिनिधी, पुणे : मिळकतकर थकविलेल्या २२८ मिळकती महापालिकेने ‘सील’ केल्या असून, ही कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू असतानाच प्रामाणिक करदात्यांसाठी लॉटरी पद्धतीने बक्षीस योजनाही सादर करण्यात आली आहे. बक्षिसांमध्ये पाच कार, १५ ई-बाइक, १५ मोबाइल आणि १० लॅपटॉपचा समावेश आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी १५ मे ते ३१ जुलै दरम्यान निवासी, बिगर निवासी, ओपन प्लॉटचा संपूर्ण मिळकतकर मालमत्ताधारकांना भरावा लागणार आहे.

बारा कोटी रुपयांचा भरणा

महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, मिळकतकराची थकबाकी असणाऱ्या मालमत्तांवर कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत २२८ मालमत्ता ‘सील’ करण्यात आल्या आहेत. ही कारवाई सुरू असताना अनेक मालमत्ताधारकांनी करभरणा केला आहे. आतापर्यंत या माध्यमातून १२ कोटी रुपयांचा करभरणा झाला आहे. महापालिकेकडून थकबाकीदारांवरील कारवाई अशीच सुरू राहणार आहे. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांसाठी; तसेच इतर नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी लॉटरी पद्धतीने बक्षीस योजना लागू करण्यात आली आहे.

Cyclone Biporjoy: अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ, मान्सूनचं काय होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
काय आहे योजना?

महापालिकेकडून १५ मे ते ३१ जुलै या कालावधीत संपूर्ण करभरणा करणाऱ्यांना सवलत दिली जाते. पालिकेला मिळकतकराची सुमारे ५० टक्क्यांहून अधिक रक्कम याच काळात मिळते. पालिकेच्या उत्पन्नाचे हे प्रमुख साधन असून, वस्तू आणि सेवा कराचे अनुदान सरकारकडून मिळते. त्यामुळे अधिकाधिक मिळकतकर वसूल करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात आयुक्तांनी प्रामाणिक करदात्यांसाठी बक्षीस देण्याची घोषणा केली होती. प्रशासनाने दिलेल्या जाहिरातीनुसार, पाच कार, १५ ई-बाइक, १५ मोबाइल आणि १० लॅपटॉपचा समवेळ बक्षिसांत करण्यात आला आहे.
महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांसाठी नवी अपडेट, पर्यटनाला जाण्यापूर्वी जाणून घ्या पोलिसांनी कोणता निर्णय घेतला?
अशी मिळणार बक्षिसे

वार्षिक मिळकतकर एक लाख रुपयांपेक्षा अधिक, ५० ते एक लाख रुपये, २५ ते ५० हजार रुपये आणि २५ हजारांपेक्षा कमी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. त्यामध्ये २५ हजार रुपयांपेक्षा कमी मिळकतकर भरणाऱ्यांसाठी दोन कार, सहा ई बाइक,सहा मोबाइल आणि चार लॅपटॉप देण्यात येणार आहेत. २५ हजार रुपयांपेक्षा कमी मिळकतकर भरणाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे या वर्गासाठी इतरांपेक्षा दुप्पट बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. उर्वरित तिन्ही वर्गांसाठी प्रत्येकी एक कार, तीन ई बाइक, तीन मोबाइल आणि दोन लॅपटॉप बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

महापालिकेने निश्चित केलेल्या १५ मे ते ३१ जुलै या कालावधीत निवासी, बिगर निवासी, ओपन प्लॉटचा संपूर्ण मिळकतकर भरणाऱ्यांना लॉटरी पद्धतीने बक्षिसे देण्यात येणार आहेत. नागरिकांनी निर्धारित कालावधीत आपला मिळकतकर भरून या संधीचा लाभ घ्यावा.

– विक्रमकुमार, महापालिका आयुक्त

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here