तुम्ही किती EMI चुकवू शकता आणि बँक कधी कारवाई करते, याबाबत तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. गृहकर्जाला सुरक्षित कर्जाच्या श्रेणीत ठेवले आहे, त्यामुळे कर्जासाठी ग्राहकाला हमी म्हणून बँकेकडे मालमत्ता गहाण ठेवावी लागते.
सलग तिसरा हप्ता न मिळाल्याने बँक ॲक्शन मोडमध्ये
गृहकर्जाचा हप्ता न भरण्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेची (आरबीआय) मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत? हे सविस्तर जाणून घेऊ. एखाद्या ग्राहकाने गृहकर्जाचा पहिला हप्ता भरला नाही, तर बँक किंवा वित्तीय संस्था त्याला गांभीर्याने घेत नाहीत. ईएमआय भरण्यास काही कारणास्तव उशीर होत आहे, असे बँकेला वाटते. परंतु जेव्हा तुम्ही सलग दोन EMI भरण्यात अपयशी होता, तेव्हा बँक प्रथम रिमाइंडर पाठवते आणि यानंतरही, ग्राहक तिसरा EMI हप्ता भरण्यात अयशस्वी झाला, तर बँक पुन्हा कर्जाची परतफेड करण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली जाते.
अशाप्रक्रारे सलग तीन कर्जाचा EMI चुकवल्यास बँक ॲक्शन मोडमध्ये येते. आणि कायदेशीर नोटीस पाठवूनही EMI न भरल्यास बँक ग्राहकांना डिफॉल्टर घोषित करते. तसेच बँक कर्ज खाते NPA मानते. तर इतर वित्तीय संस्थांच्या बाबतीत ही मर्यादा १२० दिवसांची आहे. या काल मर्यादेनंतर बँक पुनर्प्राप्ती प्रक्रियेबद्दल विचार काटे.
रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्वे
मालमत्तेला सुरक्षित कर्जामध्ये गहाण ठेवली जाते, जेणेकरून कर्ज न भरल्यास बँक ती मालमत्ता विकून कर्ज वसूल करू शकते. मात्र, बँकेकडे हा शेवटचा पर्याय आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कर्जाची परतफेड करण्यासाठी ग्राहकाला काही वेळ दिला जातो. तर कायदेशीररीत्या बँकेला त्यांचे पैसे परत मिळण्याचा शेवटचा पर्याय म्हणजे लिलाव. लिलावातून मिळालेली रक्कम कर्जाची रक्कम ऑफसेट करण्यासाठी वापरली जाते.
तर तीन महिन्यांपर्यंत ईएमआय न भरल्यानंतर बँक ग्राहकाला दोन महिन्याचा आणखी वेळ देते. आणि यामध्येही ग्राहक चूक करत असल्यास बँक ग्राहकाला मालमत्तेच्या अंदाजे मूल्यासह लिलावाची नोटीस पाठवते. जर ग्राहकाने लिलावाच्या तारखेपूर्वी म्हणजे लिलावाच्या सूचनेच्या तारखेपासून एक महिन्यानंतरही हप्ता भरला नाही, तर बँक लिलावाची औपचारिक प्रक्रिया सुरू करते.
डिफॉल्टरचा धोका
दरम्यान, या सहा महिन्यांच्या आत ग्राहक कधीही बँकेशी संपर्क साधू शकतो आणि थकबाकीची रक्कम भरून प्रकरण निकाली काढू शकतो. कर्जाची वेळेवर परतफेड न करण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे बँक ग्राहकाला डिफॉल्टर म्हणून घोषित करते. याचा मोठा फटका म्हणजे ग्राहकाचा CIBIL किंवा क्रेडिट स्कोअर खराब होतो. आणि खराब CIBIL स्कोरमुळे भविष्यात कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळण्यात अडचण येते.
अशा स्थिती जर अशी परिस्थिती एखाद्या व्यक्तीसमोर उद्भवली, म्हणजेच EMI भरण्यात अयशस्वी झालात, तर यावरही काही उपाय आहेत. ग्राहक त्याच्या आर्थिक प्राधान्याच्या आधारावर गृहकर्जाची पुनर्रचना करण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यासाठी ज्या बँकेतून त्याने गृहकर्ज घेतले आहे, त्या बँकेशी संपर्क साधू शकतो. ग्राहक आपली समस्या बँकेला सांगू शकतो, तसेच कागदपत्रे सुपूर्द करू शकतो. कर्जाची पुनर्रचना केल्यास EMI काही महिन्यांनी पुढे ढकलण्यात किंवा EMI रक्कम कमी करण्यात मदत होऊ शकते. मात्र, अशा स्थितीत गृहकर्जाचा कालावधी वाढतो.
याशिवाय गृहकर्जाचा EMI शक्य तितक्या वेळेवर भरण्याचा प्रयत्न करणे, हा एक सोपा उपाय आहे. यासाठी फिक्स डिपॉझिट असेल तर ती मोडून टाका. तसेच जर काही गुंतवणूक केली असेल तर त्यामधील रक्कम काढा आणि EMI भरा. यासाठी तुम्ही कुटुंब किंवा मित्रांकडूनही कर्ज घेऊ शकता आणि तुमच्या सोयीनुसार ते नंतर परत करू शकता.