औरंगाबाद: जिल्ह्यातील चार, तर जिल्ह्यातील एक, अशा ५० ते ९५ वयोगटातील पाच बाधितांचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) मृत्यू झाला. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील करोनाबळींची संख्या ६०६ झाली आहे. त्याचवेळी जिल्ह्यात बुधवारी (१९ ऑगस्ट) दुपारी आणखी २६ बाधितांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या १९,२८४ झाली आहे. तसेच आतापर्यंत १४,४५२ बाधित हे करोनामुक्त झाले आहेत व सध्या ४,२२६ बाधितांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. ( )

वाचा:

बजाजनगर एमआयडीसी (वाळूज) परिसरातील ९५ वर्षीय महिला रुग्णाला मंगळवारी (१८ ऑगस्ट) घाटीत दाखल केले होते व त्यापूर्वीच रुग्ण बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा मंगळवारी रात्री सव्वादहा वाजता मृत्यू झाला. घाटीतील ५२ वर्षीय बाधित कर्मचाऱ्यावर ६ ऑगस्टपासून घाटीत उपचार सुरू असतानाच रुग्णाचा मंगळवारी सायंकाळी पाच वाजता मृत्यू झाला. दर्गा रोड परिसरातील ५६ वर्षीय बाधित पुरुष रुग्णावर ८ ऑगस्टपासून घाटीत उपचार सुरू असतानाच रुग्णाचा बुधवारी पहाटे पाच वाजता मृत्यू झाला. जंगला तांडा (ता. , जि. औरंगाबाद) येथील ५० वर्षीय बाधित पुरुष रुग्णावर १५ ऑगस्टपासून उपचार सुरू होते. या रुग्णाचा बुधवारी सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी मृत्यू झाला. तर, भोगलवाडी (ता. धारूर, जि. बीड) येथील ६५ वर्षीय बाधित महिला रुग्णावर १३ ऑगस्टपासून घाटीत उपचार सुरू होते आणि रुग्णाचा बुधवारी दुपारी एक वाजता मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत ४५६, तर जिल्ह्यात ६०६ बाधितांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाचा:

शहर परिसरात २२ करोना बाधित

जिल्ह्यात दुपारी आणखी २६ नवे बाधित आढळून आले. शहर परिसरातील नव्या बाधितांमध्ये त्रिवेणी नगर येथील १, आंबेडकर नगर, चिकलठाणा १, शहागंज १, बेगमपुरा २, संजय नगर, मुकुंदवाडी १, आनंद नगर १, मुकुंदवाडी २, साईदर्शन अपार्टमेंट, जाधववाडी २, एन-नऊ, सिडको २, लक्ष्मी नगर १, प्रगती कॉलनी, टाऊन हॉल २, मारोती नगर २, तर एन-११ सिडको येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

ग्रामीण भागात चार बाधित

ग्रामीण भागातील नव्या बाधितांमध्ये नवजीवन कॉलनी, कन्नड येथील १, नारळीबाग, सोयगाव १, रांजणगाव १, तर निल्लोड, सिल्लोड येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here