मुंबई : तुम्हीपण अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने (बीएसई) अदानी समूहाच्या चार कंपन्यांच्या शेअर्सची सर्किट लिमिट बदलली आहे. अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड आणि अदानी विल्मार लिमिटेडची सर्किट मर्यादा बीएसईने ५% वरून १०% पर्यंत वाढवली असून अदानी पॉवरची सर्किट मर्यादा पूर्वी ५% होती, ती आता २०% पर्यंत वाढविण्यात आली आहे.

अदानी शेअर्सची उसळी
बीएसईने अदानी समूहाच्या चार कंपन्यांची दैनिक सर्किट मर्यादा वाढवल्यानंतर समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये बुधवारी सुरुवातीच्या व्यवहार सत्रात उसळी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रात अदानी विल्मर आणि अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये घसरण झाली होती. तर या उलट आज, अदानी ग्रीनचा स्टॉक ०.७१% वाढून ९९९.९० रुपयांवर पोहोचला असून अदानी पॉवरचा शेअर ८.८० रुपयांनी (३.३५%) वाढून २७१.८० रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी, बीएसई आणि एनएसईने २४ मे रोजी अदानी एंटरप्रायझेसला अल्पकालीन अतिरिक्त पर्यवेक्षी उपाय (ASM) फ्रेमवर्क अंतर्गत ठेवले होते.

शेअर बाजारात गुंतवणूक करताय… ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नुकसान कमी होईल, जास्तीत जास्त नफा कमवाल
आम्ही हे सुनिश्चित करू की कोणत्याही शेअरची किंमत एका दिवसात निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त किंवा खाली जाणार नाही, असे एनएसईने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

अदानी समूहाचे शेअर्स उसळले
अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर ०.६९% वाढीसह २,४५०.५० रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. वीज क्षेत्राशी संबंधित अदानी पॉवर कंपनीचा शेअर ६.०८ टक्के उसळी घेत २७९ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. अदानी टोटल गॅस लिमिटेड ०.६४% वाढून ६८२.७५ रुपये, तर अदानी ट्रान्समिशनचे शेअर्स २.५४% वाढीसह ८३६.९५ रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते.

Bank Nifty Expiry Day: बँक निफ्टीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, नियमात झाला हा बदल
अदानींच्या कोणत्या कंपन्यांची सर्किट मर्यादा वाढवली?
ASE ने अदानी पॉवरमधील सर्किट मर्यादा ५% वरून २०% केली असून अदानी विल्मार, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशनमध्ये सर्किट मर्यादा पाच टक्क्यांवरून १०% करण्यात आली आहे. मार्केट एक्स्चेंजने अदानी समूहाच्या कंपन्यांसह एकूण १७२ कंपन्यांच्या शेअर प्राइस बँडची सर्किट मर्यादा एक्सचेंजने वाढवली आहे.

अदानींनी भाजपला किती पैसे दिले? प्रश्नांचा भडीमार करत राहुल गांधी लोकसभेत मोदींवर बरसले

जानेवारीमध्ये अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सर्किट लिमिट कमी झाली
यंदा जानेवारीमध्ये किमतीतील उलथापालथ रोखण्यासाठी अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी टोटल गॅसवरील सर्किट मर्यादा NSE आणि BSE ने कमी केल्या होत्या. अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्गने अहवाल जारी केल्यावर शेअर्समध्ये मोठी पडझड सुरू झाली होती, ज्यामुळे जानेवारीमध्ये सर्किट मर्यादा कमी करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here