पालघर: दोन दुचाकी आणि एका रिक्षाचा विचित्र असा अपघात डहाणू- जव्हार- नाशिक मार्गावर घडला. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तीन जण या अपघातात गंभीररित्या जखमी झाले असून, जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दारु पिऊन ट्रॅक्टर चालवला, सुदैवानं अपघात टळले

मिळालेल्या माहितीनुसार, स्कुटी आणि मोटारसायकल अशा दोन दुचाकी आणि रिक्षा असा तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला. रिक्षाला ओव्हरटेक करून पुढे येणाऱ्या दुचाकीची समोरून डहाणूकडे येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर दोन्ही दुचाकींना पुन्हा रिक्षाने जोरदार धडक दिली. धोकादायक वळणावर ओव्हरटेक करत असताना हा भीषण अपघात घडला. अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Pune Accident: अल्पवयीन मुलांनी बाईक दामटवली; पुण्यात भीषण अपघात, दोघांचा करूण अंत
घटनेची माहिती मिळताच कासा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. कल्पेश दशरथ गोवारी (वय 30), हरेश मच्छी (रा. वापी) अशी भीषण अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. दिलीप वरठा, माणिक डगला आणि पिंकी डगला हे तिघे या अपघातात गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग तसेच पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या अपघातांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. अपघातांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात मायलेकाला आपला जीव गमवावा लागला होता, तर,वडील आणि दोन मुली गंभीर जखमी झाले होते.

शिवशाही बसला कार धडकली, मुलाच्या डोळ्यासमोर आई-वडिलांनी प्राण सोडले
वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी पालघर पोलीस दलामार्फत वाहतूक नियमावली तयार करण्यात आली आहे. ही वाहतूक नियमावली जिल्हाभर लागू करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालघर पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here