पालघर: पालघर जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. नुकताच 50 वर्षीय महिलेची गळा आवळून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मांडे गावाच्या हद्दीत घडला आहे. पद्मा बहादुरसिंग बिक (50) असे मृत महिलेचे नाव असून त्या माकणे येथे वास्तव्यास होत्या. त्या मूळ नेपाळ येथील रहिवासी आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. याप्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे.
Mumbai Police : मोबाइलवरून भांडण, १६ वर्षांच्या मुलीचं टोकाचं पाऊल, मुंबई पोलिसांमुळे मिळालं जीवदान

मिळालेल्या माहितीनुसार पालघर तालुक्यातील माकणे येथील 9 स्टार लँडमार्क या इमारतीत वास्तव्यास असलेली मूळ नेपाळ येथील रहिवासी पद्मा बहादुरसिंग बिक (50) ही महिला काही कामानिमित्त सोमवारी सायंकाळच्या सुमारास माकणे नाक्यावर गेली होती. मात्र ती पुन्हा घरी परतलीच नाही. महिला घरी आली नसल्याने घरच्यांनी रात्रभर तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेही सापडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मांडे गावाच्या हद्दीतील मुजबादेवी मंदिराच्या समोरील रस्त्याच्या पलीकडे असलेल्या प्रसन्न हरीश ठाकूर यांच्या शेतात महिलेचा मृतदेह स्थानिकांना आढळला. हा मृतदेह पद्मा बहादुरसिंग बिक यांचा असल्याची आणि संपूर्ण घटनेची माहिती त्यांचा मुलगा मदन बहादुरर्सिंग बिक आणि स्थानिकांनी सफाळे पोलिसांना दिली.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

घटनेची माहिती मिळताच पालघरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी निता पाडवी व सफाळे पोलिस दाखल झाले. मृतदेह व घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. महिलेच्या चेहऱ्यावर घाव घातल्याचे, त्याचप्रमाणे तिच्या गळ्याभोवती ओढणी गुंडाळून गळा आवळून तिची हत्या केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. महिलेच्या गळ्यात सोन्याची चेन, कानातले आणि मोबाईल असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. मात्र असा कुठलाही ऐवज मृतदेहाजवळ तसेच घटनास्थळी आढळून आला नाही. पोलिसांना घटनास्थळी महिलेची चप्पल, रिकामे पाकिट व एका पिशवीत दारुची बाटली आढळून आली. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेत सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी सफाळे पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात भादवि 302, 201 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

29 COMMENTS

  1. indian pharmacies safe [url=https://indiapharmacy.cheap/#]best online pharmacy india[/url] reputable indian online pharmacy

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here