मुंबई : मुंबईतील मरिन ड्राइव्ह इथल्या सावित्रीबाई फुले महिला शासकीय वसतिगृहात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका २० वर्षांच्या तरुणीचा विवस्त्रावस्थेत मृतदेह आढळून आला. मंगळवारी संध्याकाळी ही घटना समोर आली आणि या घटनेने एकच खळबळ उडाली. तरुणीवर आत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेत ज्याच्यावर संशय होता तो सुरक्षारक्षक प्रकाश कनोजिया याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. आता या प्रकरणी पीडित तरुणीच्या वडिलांनी वसतिगृहाच्या प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. तर ही घटना अतिशय दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे आणि जे कुणी दोषी आढळून येतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचं सांगितलं.सावित्रीबाई फुले महिला शासकीय वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. या घटनेनंतर पीडत मुलीच्या वडिलांनी टाहो फोडला आहे. त्यांनी आपली व्यथा माध्यमांसमोर मांडली आहे.

Crime: ट्रेनचं तिकीटही काढलं होतं, पण घरी जायची इच्छा अधुरीच, मुंबईच्या हॉस्टेलमध्ये तरुणीची वॉचमनकडून हत्या
माझ्या मुलीला वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर एकटीला एकाच रूममध्ये ठेवलं होतं. तिच्यासोबत दुसऱ्या कोणत्याही मुली ठेवल्या नाहीत. का नाही इतर मुली ठेवल्या? याला दोषी अंधारे मॅडम आणि कोळी मॅडम आहेत. मला एकुलती एक मुलगी होती, असं म्हणत पीडितेच्या वडिलांनी टाहो फोडला. हे सगळं सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांच्या मनाला प्रचंड वेदना होत होत्या.

Mumbai Police : मोबाइलवरून भांडण, १६ वर्षांच्या मुलीचं टोकाचं पाऊल, मुंबई पोलिसांमुळे मिळालं जीवदान
माझ्या मुलीला चौथ्या मजल्यावर एकटं ठेवणं अशा प्रकारे यांना शोभतं का? हे शासकीय वसतिगृह आहे. या सरकारी वसतिगृहातच माझी मुलगी सुरक्षित नाही. मग न्याय कुणाकडे मागायचा, मला न्याय कसा मिळणार? असा सवाल करत पीडितेचे वडील रडत रडत बोलत होते. माझ्या मुलीसोबत जे घडलं त्याला कारणीभूत वसतिगृहातील दोन मॅडम आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अन्यथा मी माझ्या मुलीचा मृतदेह स्वीकारणार नाही, असं पीडितेच्या वडिलांनी म्हटलं.

वरीष्ठ पोलिस निरीक्षक विजय कांदळगावकर यांची सेवानिवृत्ती, नागरिकांकडून जल्लोषात निरोप

काय घडलं तरुणीसोबत?

ही तरुणी पॉलिटेक्निकचे शिक्षण घेत होती. ती अकोल्याची होती आणि गेल्या काही दिवसांपासून या वसतिगृहात चौथ्या मजल्यावर राहत होती. मंगळवारी सकाळपासून ती खोलीबाहेर आली नव्हती. यामुळे इतर तरुणी तिच्या खोलीजवळ गेल्या आणि त्यांनी खोलीच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावलेली बघितली. यावेळी त्यांनी कडी उघडून पाहिल्यावर ही तरुणी खोलीमध्ये विवस्त्रावस्थेत आढळून आली. याची माहिती वसतिगृहाच्या व्यवस्थापनाला कळवली आणि त्यांनी ही माहिती मरीन ड्राइव्ह पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर ओढणीने गळा आवळून तिची हत्या केल्याचं निदर्शनास आलं. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here