नंदुरबार जिल्ह्यातल्या आसाने या छोट्याशा गावातून नेहमीच मेहनतीने केलेल्या कामांची आणि जिद्दीने पेटून यश मिळवलेल्याची बातमी समोर येत असते. नंदुरबार तालुक्यातील आसाने या दुष्काळग्रस्त गावांमधून अनेकांनी जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवत सरकारी नोकरी प्राप्त केल्या आहेत. देशाची सेवा करण्यासाठी या गावातून अनेक चेहरे भारतीय लष्करात आपली कर्तव्य बजावत आहे. आणि आता असाच एक चेहरा या गावातून समोर आला आहे. विशाल निंबा पाटील या युवकाने शेती आणि मोलमजुरी करणाऱ्या आई-वडिलांचा सांभाळ करत मोठ्या कष्टाने यश मिळवले आहे.
भारतातून सात जागांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत विशालची निवड झाली आहे. या भारतातून सात जागांपैकी महाराष्ट्रातून तीन जणांची निवड झाली आहे. त्यात विशालची भारतातून तिसऱ्या क्रमांकावर निवड झाली आहे. ग्रामीण भागात राहून शेती करून अभ्यास करत मोठ्या पदावर यश मिळवत ग्रामीण भागातील विद्यार्थीही देखील मागे नसल्याचे विशालने दाखवून दिले. शिक्षणात आवड असल्याने विशालने आपले गाव सोडून जळगाव येथे जाऊन शिक्षण घेतले शिक्षण घेत असताना अधूनमधून त्याने शेती कामांकडे देखील लक्ष घातले आई मोलमजुरी आणि बाप शेतकरी आणि ग्रामीण भाग असल्याने विशालला घरातील आणि शेतीचे काम करत अभ्यास करावा लागत आणि या सर्वातून त्याने मोठया कष्टाने यश मिळवले आहे. जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवलेल्या विशालचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचे कुटुंबात आणि गावात त्याने पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे.