पाटणा: हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या पतीला भेटायला गेली. पतीला पाहताच ८ महिन्यांची गर्भवती पत्नी बेशुद्ध पडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना बिहारच्या भागलपूरमध्ये घडली आहे. ही महिला ८ महिन्यांची गर्भवती असून येत्या २० दिवसांनी २७ जूनला तिची प्रसूती होणार होती. दीराने वहिणीच्या मृत्यूसाठी पोलिस प्रशासन जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. भागलपूर येथील विशेष मध्यवर्ती कारागृहात या महिलेचा पती असल्याची माहिती आहे.

भागलपूरच्या विशेष मध्यवर्ती कारागृहात ६ जून रोजी ही हृदयद्रावक घटना घडली. भागलपूरच्या घोघा गोविंदपूर येथील गुड्डू यादवचा विवाह घोघा जानिडीह येथील पल्लवी यादवसोबत २ वर्षांपूर्वी झाला होता. दोघांनी प्रेमविवाह केला होता आणि पल्लवी ही ८ महिन्यांची गर्भवती होती.

Mumbai Crime: मुंबईत वसतिगृहातील खोलीत तरुणीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह सापडला, सुरक्षारक्षकाची ट्रेनसमोर उडी
गुड्डू ३०७ प्रकरणी तुरुंगात

गुड्डू यादवचा विनोद यादवशी जमिनीवरुन वाद होता. या प्रकरणी गुड्डूवर कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे तो गेल्या आठ महिन्यांपासून भागलपूरच्या विशेष मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.

पल्लवीसह गर्भातील बाळाचाही मृत्यू

६ जूनला पल्लवी पती गुड्डूला भेटण्यासाठी तुरुंगात पोहोचली होती. गुड्डू तिच्या समोर येताच पल्लवी बेशुद्ध होऊन कोसळली. यानंतर तिला तात्काळ मायागंज रुग्णालयात आणण्यात आले. येथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पल्लवीच्या मृत्यूसोबतच तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला आहे. पल्लवीला आठवा महिना सुरु होता. डॉक्टरांनी तिला २७ जून ही प्रसूतीची तारीखही दिली होती. पण, त्यापूर्वीच ही घटना घडल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

फेसबुकवरील प्रेम ‘लिव्ह इन’पर्यंत आलं, संशयाचं भूत डोक्यात शिरलं, एकाच वादात सगळं संपवलं!

दुसरीकडे, गुड्डूचा भाऊ विक्की यादवने वहिणीच्या मृत्यूला पोलिस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दुसऱ्या पक्षाकडून पैसे घेऊन माझ्या भावाला तुरुंगात टाकलं, असा गंभीर आरोप त्याने केला आहे. जर, भाऊ तुरुंगात नसता तर ही परिस्थिती आली नसती. आमचं संपूर्ण कुटुंब उध्वस्त झालं आहे, असं त्याने सांगितलं.

पल्लवीच्या मृत्यूनंतर कुटुंबीय शवविच्छेदनासाठी सहमत नव्हते. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. पल्लवीचा पती अंत्यसंस्कारासाठी पोलिस संरक्षणात स्मशानभूमीत पोहोचला होता. त्यानंतर त्याने पत्नीच्या मृतदेहाला मुखाग्णी दिली.

Odisha Train Accident: कोरोमंडलचा एक डबा झुडपात जाऊन उलटला, तो तिथेच अडकून पडला, ४८ तासांनी अखेर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here