जयपूरः कॉंग्रेसमधील राजकीय नाट्यानंतर हे बुधवारी आपल्या टोंक मतदारसंघात पोहोचले. सचिन पायलटची एक झलक पाहण्यासाठी लोक सुमारे १०० किलोमीटर लांब रस्त्यावर उभे होते. १ तासाचा प्रवास ४ तासांत पूर्ण झाला. जे काही झाले तो भूतकाळ होता. आता आम्ही सर्व काही कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर सोडलं आहे, असं टोंक गाठल्यावर सचिन पायलट म्हणाले.

जयपूर-टोंक महामार्गावर जयपूर ते टोंक दरम्यान १०० किलोमीटर अंतरावर जल्लोषाचे वातावरण होते. कुठे नागरिक डीजेवर नाचत होते. तर कुठे सचिन पायलट ‘आय लव्ह यू’च्या घोषणा देत जत्थेच्या जथ्थेच्या जथ्थे फिरत होते. मोठ्या संख्येने महिलाही रस्त्यावर उतरल्या होत्या. सचिन पायलट यांचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. करोना व्हायरसच्या काळात अशी गर्दी जमवण्यावर बरेच प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर सचिन पायलट यांनी स्पष्टीकरण दिलं. आम्ही कोणालाही बोलावलं नव्हतं. आणि नागरिक आले तर त्यांना कोण कसं रोखणार, असं सचिन पायलट म्हणाले. आता जे होईल ते सोनिया गांधी यांच्या हाती आहे, असं उत्तर कॉंग्रेसमधील राजकीय संघर्षावर सचिन पायलट यांनी दिलं.

सचिन पायलट यांनी १०० किमी मिरवणूक काढली

टोंकमध्ये पोहोचलेल्या सचिन पायलट यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. फेसबुकविषयी जे काही उघड झालं आहे ती अत्यंत गंभीर बाब आहे आणि त्याची कसून चौकशी झाली पाहिजे, असं सचिन पायलट म्हणाले.

राजस्थानच्या बाहेर ३५ दिवस राहिल्यानंतर सचिन पायलट यांनी पुन्हा एकदा राजस्थानमध्ये आपलं शक्तिप्रदर्शन केल्याचं बोललं जातंय. दीड वर्षांपूर्वीच्या निवडणुकीच्या जाहीर सभेनंतर प्रथमच करोनासंबंधी निर्बंध असूनही सचिन पायलट यांनी १०० किमी लांबीची राजकीय मिरवणूक काढली. यावेळी सचिन पायलट यांनी टोंक येथे कार्यरत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि नागरिकांच्या समस्याही ऐकल्या. सचिन पायलट यांच्या या दौऱ्यासंदर्भात राजस्थान सरकारने आजूबाजूच्या जिल्ह्यांत सतर्कतेचा इशारा दिला होता. तसंच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here