लंडन : मोहम्मद सिराजने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये उस्मान ख्वाजाला बाद करून ऑस्ट्रेलियाची सुरुवातच बिघडवून टाकली. ग्रीन टॉपवर नाणेफेक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी दिलेले पाचारण चौथ्या षटकातच योग्य ठरू लागल्याचे दिसले. या विकेटवर मोहम्मद सिराज जितका आनंदी होता त्यापेक्षा विराट कोहली जास्त उत्साहित दिसत होता.वास्तविक, चौथ्या षटकातील चौथा चेंडू उस्मान ख्वाजासाठी कर्दनकाळ बनून आला. ही एक वॉबल सीम डिलिव्हरी होती. परफेक्ट लाईन लेन्थवर टाकलेला चेंडू उस्मान ख्वाजाला खेळावा लागला. पण चेंडू बॅटच्या बाहेरील कडा घेऊन यष्टिरक्षक केएस भरतच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. ख्वाजा स्वत:ला नाबाद समजून रिव्ह्यू घेण्याचा विचार करत होता, पण वॉर्नरने त्याला सांगितले की तू शून्यावर बाद आहेस.

WTC Final : ऐतिहासिक ओव्हल मैदान स्तब्ध, ओडिशा अपघातातील मृतांना आदरांजली, काळीपट्टी बांधून टीम इंडियाकडून शोक व्यक्त
विराटचे सेलिब्रेशन झाले व्हायरल

१० चेंडूंवर शून्यावर बाद झालेल्या उस्मान ख्वाजाच्या विकेटचा आनंद विराट कोहलीच्या चेहऱ्यावरही स्पष्ट दिसत होता. स्लिपमध्ये असलेल्या विराटने आनंदाने उडीच मारली. त्याने धावत जाऊन सिराजला मिठी मारली. २०१७ मध्ये भारताकडून टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सिराजने दोन वर्षांनंतर प्रथमच एकदिवसीय सामना खेळला आणि पुढच्याच वर्षी त्याला कसोटी संघात संधी मिळाली.

VIDEO: आऊच! सिराजचा आग ओकणारा चेंडू थेट लबुशेनच्या हातावर, वेदनेने कळवळत थेट बॅट फेकली आणि….
असे विकसित केले गुप्त हत्यार

सिराज आधी इनस्विंग गोलंदाजी करायचा. पण नंतर या कलेवरील पकड कमकुवत झाल्याने त्याने आऊटस्विंगर विकसित केले. नंतर हळूहळू बॉवल-सीम डिलिव्हरीवर काम केले. सिराज ज्या सीम पोझिशनमधून गोलंदाजी करतो ती नैसर्गिक आउटस्विंगरसाठी असते. सिराज म्हणतो की, जेव्हा मी ही सीम वापरतो तेव्हा चेंडूची स्थिती फाइन लेगकडे झुकते. हा चेंडू टाकत असताना, मी चेंडू हिट द डेक करण्यासाठी खूप जोर लावतो. कारण तसे करणे अधिक प्रभावी असते. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत सिराजला आता अधिक संधी मिळतात आणि प्रत्येक वेळी त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. आता त्याचा हा सिक्रेट बॉल त्याचे सर्वात मोठे शस्त्र मानले जात आहे.

आर अश्विनला WTC फायनलच्या संघातून का वगळले? रोहितने सांगितले कसा घेतला अवघड निर्णय
भारताची प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन

डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here