छत्रपती संभाजी नगर: प्रेम आपल्या हातून काही घडवू शकतं. प्रेमात व्यक्ती एकदा वेडी झाला की तो ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. असेच काहीसे घडले आहे छत्रपती संभाजी नगरमध्ये. भाच्याने लग्नासाठी मामाकडे मुलीचा हात मागितला. मात्र मामाने मुलीला शिकवायचे असल्यामुळे भाच्याला नकार दिला. मामाने मुलगी देण्यास नकार दिल्याच्या रागात भाच्याने मामाच्या मुलीचे फोटो एडिट करून व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड केले. या धक्कादायक प्रकारानंतर मामाच्या तक्रारीवरून भाच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Crime : मुंबईत तरुणीची हत्या; एकुलती एक मुलगी होती, पीडितेच्या वडिलांना अश्रू अनावर, महिला कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये सचिन (नाव काल्पनिक आहे) हा कुटुंबीयांसोबत राहतो. याच गावामध्ये त्याचे मामा देखील राहतात. उच्चशिक्षित सचिनने मामाची मुलगी आवडत असल्यामुळे मामाकडे मुलीसाठी हात मागितला. मात्र मामाने मुलीला शिकवायचं असल्यामुळे यास नकार दिला. घडलेल्या प्रकारामुळे दोन्ही कुटुंबामध्ये तणावाच वातावरण निर्माण झालं आणि यातून वाद निर्माण झाला. याप्रकरणी दोनही कुटुंबांनी सचिनला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

मुंबईत वसतिगृहात तरुणीचा मृतदेह सापडला, संशयित आरोपीनं स्वतःच जीवनही संपवलं

मामाने मुलगी दिली नाही याचा राग सचिनच्या मनात होता. यामुळे सचिनने मे महिन्यात मामाच्या मुलीचे फोटो एडिट करायला सुरुवात केली. ही बाब मामाच्या कुटुंबीयांना कळतच मामाने सचिनला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र सचिनची विकृत मानसिकता त्याने ते स्टेटसवर ठेवत पुन्हा मुलीची बदनामी करायला सुरुवात केली. दरम्यान 19 मे ते 12 जून दरम्यान हा संपूर्ण प्रकार सुरू होता. सचिनचा हा प्रकार सुरूच असल्यामुळे संतापलेल्या मामाने पोलीस अधीक्षक ग्रामीण कार्यालय सायबर पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी तक्रार दिली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यामध्ये सचिनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here