मुंबई : पत्नीच्या ३८ वर्षीय प्रियकराची हत्या करुन ठाणे जिल्ह्यातील जंगलात त्याचा मृतदेह पुरला. एक जून रोजी घडलेली ही घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी तरुणाचा मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मयत दिनेश प्रजापतीचे आरोपी सुरेश कुमार कुमावत याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप आहे.

कुमावत दाम्पत्य आणि महिलेचा प्रियकर हे मुंबईतील बोरिवलीच्या राजेंद्र नगरमध्ये राहत होते. आरोपी पती सुरेश कुमार कुमावतने दिनेश प्रजापतीला आपल्या बायकोपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता, परंतु त्याने आरोपीला गांभीर्याने घेतले नाही” असे समता नगर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले.

एक जून रोजी सुरेशने दिनेशला त्यांच्या वस्तीत बोलावून भांडण उकरुन काढले. वाद सुरु असताना सुरेशने दिनेशवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे.

CCTV : मेट्रो येताना दिसली, नवऱ्याने बायकोला उचललं आणि रुळांवर झोकून दिलं, क्षणार्धातच…
सुरेशने दिनेशच्या डोक्यावर हातोड्याने अनेक वेळा वार केले. यामध्येच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने दिनेशचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि ठाण्यातील घोडबंदर रोडवर नेला. तिथे त्याने तो जंगलात पुरला,” असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

भाच्याने अश्लील व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेलिंगमुळे मामीने जीवन संपवलं; भाचा म्हणतो, तीच मला…
दिनेश घरी न परतल्याने कुटुंबीयांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना, बोरिवली पोलिसांना दिनेश त्याच्या घरातून बाहेर पडताना दिसला, तर आरोपी त्याच्या स्कूटरवर एका पोत्यातून काहीतरी घेऊन जाताना पाहायला मिळाला.

मुंबईत वसतिगृहात तरुणीचा मृतदेह सापडला, संशयित आरोपीनं स्वतःच जीवनही संपवलं

पोलिसांनी सुरेशची कसून चौकशी केली असता त्याने दिनेशचा खून केल्याची कबुली दिली. ज्या ठिकाणी त्याचा मृतदेह पुरला होता, त्याबद्दलही आरोपीने पोलिसांना सांगितले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगळवारी मृतदेह ताब्यात घेतला.

मुलाचा खून झालाय, बापाने संशयितांची नावंही सांगितली, इतक्यात पोलीस म्हणाले बेबी बाई कुठेय?
आरोपीला अटक करण्यात आली असून कलम ३०२ (हत्या) आणि २०१ (पुरावा नष्ट करणे) यासह भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here