पुणे: क्रिकेट खेळत असताना चेंडू टाकण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादात तरुणाला पाच जणांनी कोयता आणि लोखंडी गजाने बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. बारामती तालुक्यातील गुणवडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ ४ जून रोजी ही घटना घडली.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

हर्षवर्धन नवनाथ गावडे (वय १९)असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने बारामती पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी भूषण संजय गावडे, निखिल संजय गावडे, दीपक ऊर्फ भैय्या अनिल वायसे, अण्णा गोरख हारे आणि विनोद पोपटराव गावडे (सर्वजण रा.गुणवडी, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

जमिनीचा वाद, न्याय न मिळाल्यानं शेतकऱ्याचं टोकाचं पाऊल, लेकाला बघताच आईचा आक्रोश; बारामतीत काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षवर्धन गावडे आणि मारहाण करणारे आरोपी हे एकाच गावातील आहेत. सर्वजण जिल्हा परिषद शाळेजवळ क्रिकेट खेळत होते. या वेळी हर्षवर्धनचा इतर पाच जणांशी बॉल टाकण्यावरून शाब्दिक वाद झाला. या वादात भूषणने त्याला शिवीगाळ केली. शिवीगाळ करू नको, असे हर्षवर्धन म्हणाला आणि त्याला मारहाण केली.

Pune Crime: तू परत रस्त्यावर दिसली…; बारामतीत महिला सरपंचांच्या अंगावर गाडी घातली
‘तुझे बऱ्याचदा झाले आहे. तुला चांगलाच हिसका दाखवतो,’असे म्हणत भूषणने घरी जात कोयता आणला. निखिल लोखंडी गज घेऊन आला. भूषणने कोयत्याने डाव्या बाजूस कपाळावर मारले, तर निखिलने डोक्यात गज मारला. अन्य तिघांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच’तुला जिवंत सोडणार नाही,अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी हर्षवर्धनला रात्री बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. प्राथमिक उपचारांनंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बारामती पोलिस पुढील तपास करीत आहेत.

नातेवाईक शरीरसुखाची मागणी करतोय, पोलिसांची वाईट वागणूक, अजितदादांच्या ऑफिसमधून फोन गेला अन्…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here