लंडन: तरुणाने तरुणीचा पाकिस्तान ते ब्रिटनपर्यंत पाठलाग केला. त्यानंतर त्याने या तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. मग तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला. मोहम्मद अर्सलान (वय – २७) असं आरोपीचं नाव आहे. त्याने २१ वर्षीय हिना बशीरची हत्या करुन तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला. मग तो ज्या गोदामात कामगार म्हणून काम करायचा त्याच औद्योगिक परिसरात नेऊन टाकला.

कोव्हिड मास्क तोंडात कोंबून केला खून

द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, हिना ही बिझनेस मॅनेजमेंटची विद्यार्थिनी होती आणि ती पाकिस्तानमधील एका गावातली रहिवासी होती. आरोपी अर्सलान बऱ्याच काळापासून तिच्या मागे लागलेला होता. तो त्याच्या मित्रांना सांगायचा की हिना त्याची होणारी बायको आहे. अर्सलानने हिनाला कोव्हिड मास्कने मारल्याचं तपासात समोर आलं आहे. त्याने कोव्हिड मास्क तिच्या तोंडात घातला. ज्यामुळे तिला श्वास घेता आला नाही आणि गुदमरुन तिचा मृत्यू झाला. एका घरात ही घटना घडली. त्यानंतर आर्सलानने तिला एका मोठ्या सुटकेसमध्ये टाकलं आणि आपल्या ड्रायव्हरला सांगितलं की मित्राला काही द्यायचे आहे त्यामुळे औद्योगिक परिसरात चल. त्यानंतर त्याने या परिसरात मृतदेह फेकून दिला.

आई-वडिलांच्या मध्ये झोपलेला, नाकातून रक्त अन् २ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू, पोलिसांना वेगळाच संशय
म्हणाला- चुकून मारला

हिनाला मारण्याचा माझा हेतू नव्हता, ते चुकून घडलं, असे अर्सलानने न्यायालयासमोर सांगितले. त्यांनी हत्येचा आरोप नाकारला आहे. हिना गेल्या वर्षी जुलै महिन्यात अर्सलानच्या घरी गेली होती, पण परत ती कधीच परतली नाही. अर्सलान या घरात शिफ्ट झाला होता आणि हिनाचे काही सामान राहिले होते, जे ती परत घेण्यासाठी आली होती. काही दिवसांनी तिचा मृतदेह एका सुटकेसमध्ये सापडला होता. पोलिसांना पुराव्यांवरुन कळालं की अर्सलान हा हिनाच्या मागावर होता. हिना नोव्हेंबर २०२१ मध्ये अभ्यासासाठी ब्रिटनला आली होती. दोघेही एकाच गावचे रहिवासी होते.

स्थानिक पुढाऱ्यांना घाम फोडणाऱ्या नेत्याची पुण्यात गोळ्या घालून हत्या

सीसीटीव्ही आणि टॅक्सी ड्रायव्हरनेही उघड केले की अर्सलान एक जड सुटकेस घेऊन घराबाहेर पडला होता. जे त्याने एका ठिकाणी फेकले. दुसरीकडे हिनाच्या फोनचं लोकेशन तपासलं असता ते अर्सलानच्या संपर्कात असल्याचं समोर आलं आहे. तो तिला मेसेज करायचा की तो तिच्याशीच लग्न करेल. हिनाही दुसऱ्या एका व्यक्तीच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

२० दिवसांवर प्रसूती, तुरुंगात पतीचा चेहरा बघताच बेशुद्ध पडली, दोन जीवांनी एकत्र जग सोडलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here