इस्रायलशी पाकिस्तान करार करणार नाही
इम्रान खान यांनी पाकिस्तानी न्यूज चॅनेल वर्ल्ड टीव्हीला मुलाखत दिली. इस्रायलबाबत आमचं धोरण स्पष्ट आहे. फिलिस्तीनच्या नागरिकांना हक्क आणि स्वतंत्र देश मिळेपर्यंत पाकिस्तान कधीच इस्रायलला स्वीकारू शकत नाही, असं कायदे आजम (महमद अली जिन्ना) म्हणाले होते. यामुळे पाकिस्तान आणि इस्त्रायलमध्ये राजनैतिक संबंध नाहीत आणि एकमेकांचे विमानांना हवाई क्षेत्र वापरण्याची परवानगी नाहीए, असं इम्रान खान म्हणाले.
इस्रायलशी काश्मीरचे नाव जोडले
आम्ही जर इस्रायलला मंजुरी दिली आणि फिलिस्तीनच्या नागरिकांवर केलेल्या अत्याचारांकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला काश्मीर देखील सोडावे लागेल आणि ते आपण करू शकत नाही. संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि इस्रायल यांच्यात नुकत्याच झालेल्या शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी ही टीका केली. प्रत्येक देशाचे आपले परराष्ट्र धोरण असते, असं भाष्य इम्रान खान यांनी युएईच्या इस्रायलशी संबंधांवर भाष्य केलं.
सौदी अरेबियाशी तणाव नाही
काश्मीरच्या मुद्यावरून सौदी अरेबियाशी पाकिस्तानच्या संबंधांमध्ये तणाव आल्याचा त्यांनी इन्कार केला. सौदी अरेबिया हा आमचा मुख्य मित्र आहे आणि आमचे संबंध अजूनही बंधुभावाचे आहेत आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही, असं इम्रान खान म्हणाले. सौदीने पाकिस्तानची आर्थिक मदत रोखलीय. याशिवाय पाकिस्तानी लष्करप्रमुखांना रिकाम्या हाताने परत पाठवलं आहे.
पाकिस्तानचे भवितव्य चीनशी जुळलेले
इम्रान खान यांनी चीनशी पाकिस्तानच्या संबंधांती स्तुती केली. देशाचे भवितव्य आता चीनशी जोडले गेले आहे. सर्व कठीण काळात चीन पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला आहे. येत्या हिवाळ्यात चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग पाकिस्तान दौर्यावर येणार आहेत, असं इम्रान म्हणाले. संरक्षण आणि व्यापारासह अनेक क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये करार होऊ शकतात, असं इम्रान खान यांनी सांगितलं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times