नवी दिल्ली: केंद्र सरकारने देशातील महिलावर्गासाठी एक गुंतवणुकीची योजना आणली असून या योजनेची घोषणा फेब्रुवारी महिन्यात मांडलेल्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या योजनेचं नावं ‘महिला सन्मान बचत पत्र’ असं आहे. केवळ २ महिन्यांच्या कालावधीतच या योजनेत तब्ब्ल पाच लाख महिलांनी गुंतवणूक केली आहे. वित्त मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. तसेच या अधिकाऱ्याने इकॉनॉमिक्स टाइम्सशी बोलताना सांगितले की, महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत आतपर्यंत ३,६६६ कोटी रुपये जमा झाले आहेत. या योजनेला महिलांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे या अधिकाऱ्याने नमूद केले.

तुम्ही पण व्हा श्रीमंत! कमी पगार पण तुम्हालाही करोडपती होता येईल, हा खास फॉर्म्युला पडेल उपयोगी
काय आहे ही योजना:
या योजनेअंतर्गत देशातील महिला पोस्ट ऑफिसात बचत खाते उघडू शकतात. तसेच या बचत खात्यात एक हजार रुपये रक्कमेपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येऊ शकते. या योजनेत ७.५% टक्के व्याजदराने परतावा मिळेल. महिलांनी या बचत खात्यात दोन लाख रुपये जमा केल्यानंतर या महिलेला दोन वर्षांनंतर २ लाख ३२ हजार रुपये मिळतील. पोस्ट ऑफिसात सुरुवात झालेल्या या योजनेला बँकांच्या तुलनेत अधिक व्याज मिळणार आहे . तसेच खातेधारकाला कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागणार नाही. ही योजना पूर्णपणे करमुक्त असेल. या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला एप्रिल महिन्यापासून २०२५ पर्यंत बचत खाते उघडू शकतात.

गुड न्यूज… BSNLला मोदी सरकारचा बूस्टर डोस, ८९००० कोटींच्या पॅकेजला मंजूरी!
या योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतील?
महिला आणि तरुणींना या योजनेसाठी आधार कार्ड झेरॉक्स आणि दोन पासपोर्ट साईझ फोटोंची आवश्यकता लागेल. तसेच खात्यावर ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरणाऱ्या महिलांना पॅन कार्ड अनिवार्य असेल. महिला सन्मान बचत योजनेअंतर्गत एकदा खाते उघडल्यानंतर पुन्हा तीन महिन्यापर्यंत दुसरे बचत खाते उघडता येणार नाही.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना यशस्वी झाल्यानंतर ही योजनादेखील यशस्वी होईल अशी सरकारला आशा आहे . ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत डिपॉजिट मर्यादा तीस लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती. यामुळे मे महिन्यात या योजनेअंतर्गत १३,००० कोटी जमा झाले आहेत.

Home Loan EMI: सलग तीनवेळा गृहकर्जाचा EMI पेमेंट चुकला तर काय होईल? एक नोटीस अन् बँक ॲक्शन मोडमध्ये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here