महागाईमुळे सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे बजेट कोलमडले जात आहे. त्यात आर्थिक संकटाची भर पडली आहे. आता तूरडाळीचे दर गगनाला भिडले आहे. त्यामुळे जेवणाच्या ताटातून तूरडाळ गायब होण्याचे संकेत आहे. बाजार समितीत तुरीचे दर दहा हजारांवर रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहे. दुसरीकडे तूरडाळीचे दरही भडकले आहेत. तुरीच्या डाळीची किंमत १३५ रुपयांहुन प्रती किलोवर गेली आहे. दरम्यान एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तूर दरात वाढ होत आहे. सध्या तुरीची डाळ खूप महाग झाली आहे. परिणामी नागरिक त्रस्त झाले आहेत. सद्यस्थित देशभरात तुरीचा पेरा घटला आहे. त्यातच अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे.

देशात तुरीची डाळ आवडीने खाल्ली जाते. त्यामुळे तूरडाळीची मागणी नेहमीच वाढत राहते. त्यात उत्पादनात घट झाली आहे. दुसरीकडे मागणी वाढली. त्यामुळे तूरडाळीचे दरही गगनाला भिडल्याचे चित्र आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांत तूरडाळीच्या दरात ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. डिसेंबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या तीन महिन्यांच्या कालावधीत तूरडाळ घाऊक बाजारात भाव ९० रुपये किलोपर्यंत होते. तर मार्चमध्ये दर १०५ रुपये अन् एप्रिलमध्ये ११२ रुपये किलोपर्यंत गेले. आता काही ठिकाणी १३५ ते १४० रुपयांपर्यंत तूरडाळीचे भाव गेले आहे. इतर बाजारांबरोबरच अकोला कृषी बाजारातही तुरीची आवक घटली आहे. मात्र, डाळींची आवक घटल्याने फेब्रुवारीपासून डाळींची दरवाढ होण्यास सुरुवात झाली.
Tur Rate: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज,तुरीला यंदाच्या हंगामातील रेकॉर्डब्रेक दर, राज्यात कुठं मिळाला सर्वाधिक भाव

दरम्यान एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तुरीच्या दरात सतत वाढ होत गेली. सध्या अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीचे दर ८ हजार पासून १० हजार ३५५ रुपये प्रतिक्विंटल पार पोहोचले. परिणामी आता तूरडाळ देखील महागली आहे. सद्यस्थित बाजारात तुरीची डाळ प्रति किलो १३० ते १३५ तर कुठे १४० रुपये विक्री होत आहे. मागील वर्षी देशभरातच नव्हे, तर जगभरात तुरीचा पेरा घटला. त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यातच वातावरणाचा फटका बसल्याने उत्पादन घटले आहे. दुसरीकडे, मागणी कायम असल्याने तुरीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.

दरम्यान मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजार समितीत अवकाळी पावसाने डाळींची आवक घटल्याने डाळींची दरवाढ झालेली आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातुन दाखल होणाऱ्या डाळींच्या उत्पादनाला पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे एपीएमसीत आवक घटली परिणामी एपीएमसीत तूरडाळ, उडीद डाळिंची शंभरी पार तर मुगडाळीच्या दरात ३% दरवाढ झाली आहे. एपीएमसी बाजारात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश येथून डाळी दाखल होतात, परंतु राज्यातून आणि गुजरात मधून मोठ्या प्रमाणावर डाळींची आवक होते. मात्र पावसामुळे उत्पादनाला फटका बसला आहे, तसेच डाळिंची आयात देखील होत नाही. त्यामुळे बाजारात डाळींची आवक घटली आहे. फेब्रुवारी पासून डाळींची दरवाढ होण्यास सुरुवात झाली असून आता पुन्हा डाळींचे दर कडाडले आहेत.

तेलाचे डबे, साबुदाण्याची पोती; काजू-बदाम, साबण; लाखोंच्या मालावर डल्ला, चोरी करण्यासाठी थेट कार

तूरडाळ ४०८५ क्विंटल, उडीद डाळ १४१४क्विंटल आणि मुगडाळ १३०० क्विंटल आवक झाली आहे. मे महिन्यात घाऊक बाजारात तूरडाळ प्रतकिलो १००रुपयांनी उपलब्ध होतीझ त्यामध्ये १५% दरवाढ झाली असून ११५ रुपयांवर गेली आहे. तेच उडीद डाळ ९५ रुपयांवरून ६% दरात वाढ झाली असून १०१ रुपयांनी विक्री होत आहे. तर मुगडाळ ९५ रुपयांवरुन ९८ रुपयांना विक्री होत आहे. यंदा डाळींचे उत्पादन कमी असल्याने यंदा डाळींचे दर चढेच राहतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तुरीच्या दरात सतत वाढ होत असल्याने तूरडाळ आणखी महाग होण्याचे संकेत आहे. तूरडाळीचे दर कमी करण्यासाठी केंद्रशासनाकडून साठेबाजीवर लक्ष दिलं जात आहे. त्यात प्रामुख्याने अकोला केंद्र आहे. मागील काही दिवसांपूर्वी केंद्रीय पथकाने पाहणी सुद्धा केली होती. आगामी दिवसांत आणखी तुरीची डाळ महाग होण्याचा अंदाज कृषी अभ्यासकांनी वर्तवला आहे.

इतर डाळींचे दर काय?

डाळ – दर (प्रति किलो)
तूर – विक्री १४० अंदाजे (होलसेल बाजार ११८ ते १२६)
हरभरा – ६६ ते ६८ रुपये
मठ – ९० ते ९५ रुपये
उडीद – ९० ते ९५ रुपये
मूग – ९५ ते ९८ रुपये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here