जळगाव : लहानपणापासूनच सतत उद्योगी…. अभ्यास एके अभ्यास…. एकमेव हाच ध्यास… शालेय शिक्षण घेतांना घरात वीज नव्हती… रॉकेलचा कंदील पेटवायचा… दुसऱ्याची झोपमोड नको म्हणून त्याला पोस्टकार्ड लावून मुलाने अभ्यास केला…. हे सर्व श्रेय त्याच्या कष्टाचे …त्याचे कष्ट सार्थकी लागलेत… आज तो शिक्षणाची पंढरी असलेल्या पुणे विद्यापीठाचा कुलगुरु झाला… यापेक्षा मोठा आनंद आम्हा आई-वडिलांना दुसरा कोणता असणार…? या भावना आहेत पुणे विद्यापीठाचे नुतन कुलगुरु डा. सुरेश गोसावी यांच्या नव्वद वर्षे वय असलेले वडिल वामनगीर गोसावी यांच्या..!सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांची निवड झाली. प्रा. गोसावी हे जळगाव तालुक्यातील धामणगाव येथिल मूळ रहीवासी आहेत. त्यांची पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड होताच धामणगावात राहणाऱ्या त्यांच्या आई-वडिल व कुटुंबीयांनाच नव्हे तर संपूर्ण गावातच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रा. गोसावी यांचे वडील वामनगीर गोसावी हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. नव्वद वर्षे वय असले तरी मुलाच्या निवडीमुळे त्यांच्या अंगात तरुणांनाही लाजवेल असा उत्साह संचारला होता. यावेळी त्यांनी मटा शी बोलतांना प्रा. गोसावी यांनी जळगाव जिल्ह्यात शिक्षण घेतांना घेतलेल्या कष्टांच्या आठवणींना उजाळा दिला.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! सोयाबीनच्या हमीभावात मोठी वाढ; पाहा कोणत्या पिकाला किती मिळाला हमीभाव
बदलीमुळे जिल्ह्यात तीन ठीकाणी शिक्षण

वामनगीर गोसावी यांनी सांगीतले की, शिक्षक असल्याने त्यांच्या बदली होत असत. प्रा. सुरेश गोसावी यांचे प्राथमिक शिक्षण धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे झाले. यावल तालुक्यातील किनगाव येथून त्यांनी दहावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी जळगावातील मू.जे. महाविद्यालयातून अकरावी व बारावी सायन्स पू्र्ण केले. त्यानंतर नूतन मराठा मराठा महाविद्यालयातून त्यांनी बीएसस्सी इलेक्ट्रानिक्स विषयातून पदवी पूर्ण केली. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी कर्मभूमी असलेले पुणे शहर गाठले. तेथून उच्च शिक्षण घेतल आणि आज त्याच शहरातील शिक्षण क्षेत्रातील मोठ्या पदावर त्यांची नियुक्ती झाल्याने आम्हा कुटुंबीयांना अत्याधिक आंनद झाला असल्याच्या भावना वडील वामनगीर गोसावी यांनी व्यक्त केल्यात. यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते.

RBI उद्या करणार मोठी घोषणा, EMI भरणाऱ्यांना दिलासा मिळणार की बोजा वाढणार?, वाचा संपूर्ण तपशील
अभ्यासासाठी वाट्टेल ते केले

प्रा. गोसावी यांच्या अभ्यासाच्या आठवणी सांगतांना वडील वामनगीर भावनावश झालेत. मुलगा सुरेश याने लहानपणासूनच अभ्यासाचा ध्यास घेतला होता. सतत अभ्यास करीत असत. वीज नसल्याने रात्री कंदील लावून उशीरापर्यंत त्याने अभ्यास केला. गाईड न वापरता केवळ मूळ पुस्तके वाचूनच अभ्यास करण्याचे त्याचे वैशिष्ट्य असल्याचेही ते म्हणाले. पुण्यात गेल्यावरही प्रा. गोसावी यांनी अभ्यासाची कास सोडली नाही. दोन वर्षे फेलोशीप साठी अमेरिकेस गेले. त्याच्या यशाचे श्रेय हे त्याने अभ्यासासाठी घेतलेले कष्टच असल्याचेही त्यांनी सांगीतले. जळगाव विद्यापीठात देखील कुलगुरु पदासाठी प्रा. गोसावी यांनी मुलाखत दिली होती. तेथे त्यांना यश मिळाले नाही. मात्र, पुणे विद्यापीठात त्यांना ही संधी मिळाल्याने या निमित्ताने धामणगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा गौरव झाल्याचेही ते म्हणाले.

ओडिशा रेल्वे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी रिलायन्स फाऊंडेशन आले पुढे, १० मोठ्या निर्णयांसह नोकरी देण्याची घोषणा
आता मोठी जबाबदारी पार पाडावी

मुलगा प्रा. सुरेश यांना पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची मोठी जबाबदारी मिळाली आहे. त्याने ती नियमाच्या चौकटीत व कशोसीने पार पाडावी गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत, हीच अपेक्षा असल्याचेही वामनगीर गोसावी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here